पाकिस्तानच्या महिलांचा न्यूझीलंडला धक्का, T20I मालिका जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी आजचा दिवस (दि.5) ऐतिहासिक ठरला. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या T20I सामन्यात 10 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. यासह न्यूझीलंडविरुद्धची पहिली T20I मालिकाही जिंकली. यासह पाकिस्तानच्या महिला संघाने 5 वर्षांपासून सुरू असलेला घरापासून दूर मालिका जिंकण्याचा दुष्काळही संपुष्टात आणला. पाकिस्तान महिला संघाने शेवटची मालिका 2018 मध्ये … The post पाकिस्तानच्या महिलांचा न्यूझीलंडला धक्का, T20I मालिका जिंकली appeared first on पुढारी.
#image_title

पाकिस्तानच्या महिलांचा न्यूझीलंडला धक्का, T20I मालिका जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी आजचा दिवस (दि.5) ऐतिहासिक ठरला. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या T20I सामन्यात 10 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. यासह न्यूझीलंडविरुद्धची पहिली T20I मालिकाही जिंकली. यासह पाकिस्तानच्या महिला संघाने 5 वर्षांपासून सुरू असलेला घरापासून दूर मालिका जिंकण्याचा दुष्काळही संपुष्टात आणला. पाकिस्तान महिला संघाने शेवटची मालिका 2018 मध्ये बांगलादेशविरुद्ध घराबाहेर जिंकली होती. संघाच्या या विजयात आलिया रियाझ आणि फातिमा सना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (PAK vs NZ)
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या 4 षटकात संघाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या. यानंतर संघाला पहिला धक्का बसला शवाल झुल्फिकारच्या रूपाने 5 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जो 7 धावा करून बाद झाला. मुनिबा अली वेगाने धावा करत होती.ती २८ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३५ धावा करून बाद झाली. (PAK vs NZ)
मुनिबा बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक लागला, एकेकाळी संघ 100-110 धावांपर्यंतच मजल मारेल असे वाटत होते. मात्र त्यानंतर आलिया रियाझने 22 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 32 धावा केल्या. तिच्या नाबाद खेळीने संघाला १३७ धावांपर्यंत मजल मारून मारली. तिची ही खेळी सामन्यात टर्निंग पॉईंट ठरली.
138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्ये सुझी बेट्स, सोफी डिव्हाईनसह संघाने 4 विकेट गमावल्या. जॉर्जिया प्लिमरने 28 चेंडूत 28 धावांची खेळी केली. पण ती संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. जॉर्जियाशिवाय न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला 25 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. न्यूझीलंड संघाला निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावून केवळ 127 धावा करता आल्या. पाकिस्तानसाठी फातिमा सनाने सलग दुसऱ्या सामन्यात ३ बळी घेतले. यामध्ये तिने सुझी बेट्स आणि सोफी डिव्हाईनच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

That sweet series win feeling 👍🤗#NZWvPAKW | #BackOurGirls pic.twitter.com/cs6rKRrjNy
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 5, 2023

हेही वाचा :

Karnataka Lokayukt : कर्नाटकात लोकायुक्तांचा दणका; ६३ ठिकाणी छापे
सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा
Karnataka Lokayukt : कर्नाटकात लोकायुक्तांचा दणका; ६३ ठिकाणी छापे

The post पाकिस्तानच्या महिलांचा न्यूझीलंडला धक्का, T20I मालिका जिंकली appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी आजचा दिवस (दि.5) ऐतिहासिक ठरला. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या T20I सामन्यात 10 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. यासह न्यूझीलंडविरुद्धची पहिली T20I मालिकाही जिंकली. यासह पाकिस्तानच्या महिला संघाने 5 वर्षांपासून सुरू असलेला घरापासून दूर मालिका जिंकण्याचा दुष्काळही संपुष्टात आणला. पाकिस्तान महिला संघाने शेवटची मालिका 2018 मध्ये …

The post पाकिस्तानच्या महिलांचा न्यूझीलंडला धक्का, T20I मालिका जिंकली appeared first on पुढारी.

Go to Source