भाजपच्या विधानसभा विजयाचे जगभर पडसाद!
वॉशिंग्टन वृत्तसंस्था : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून बाजी मारली. या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानल्या जात असल्याने त्याबाबत परदेशी माध्यमांनीही ठळकपणे वृत्ते प्रसिद्ध केली. (Assembly election results)
न्यूयॉर्क टाइम्स (अमेरिका) : भारतातील तीन मोठ्या राज्यांमध्ये विजय मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव वाढलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे निकाल २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तसेच मोदींच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या टर्मसाठी नक्कीच अनुकूल आहेत. मोदींची आधीच मजबूत असलेली पकड आणखी घट्ट होणार आहे. येत्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाने ती झळाळूनही निघेल.
बीबीसी (ब्रिटन): भाजपने तीन राज्यांत मिळविलेला नेत्रदीपक विजय भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल. मोदींना सलग
तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्याच्या मूडमध्ये भारत देश असल्याचे या निकालांवरून अधोरेखित झाले आहे.
रशियन टाइम्स (रशिया): नरेंद्र मोदींच्या पक्षाने भारतातील प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्या आहेत. मध्य प्रदेशचा गड राखला आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांतून मात दिली आहे. मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि सब का साथ, सब का विकास या कार्यक्रमांचा हा विजय आहे.
टीआरटी वर्ल्ड (तुर्कीये) : नेहरू-गांधी
घराण्याचा वारसा असलेल्या राहुल गांधींसाठी भाजपचा तीन राज्यांतील विजय धक्कादायक आहे. एकेकाळी भारतीय राजकारणात निर्विवाद वर्चस्व असलेल्या काँग्रेसला २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सलग दोनदा मात दिल्यानंतरही मोदी आणि भाजप विजयी घोडदौड सुरूच आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यकाळाच्या दहाव्या वर्षातही प्रचंड लोकप्रिय आहेत. हा विजय त्याचे द्योतक आहे.
ब्लूमबर्ग (अमेरिका) :
केंद्रात मोदींचे सत्तेत पुनरागमन होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव झालेला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे हे निकाल असल्याने पुढे लोकसभा लढवताना ते मोदी व भाजप दोहोंना प्रेरक ठरतील.
रॉयटर्स (ब्रिटन)
तीन राज्यांतील भाजपचा विजय माध्यमांना अनपेक्षित होता. पण जनतेने कौल दिला आहे. या निकालाने मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची वाट आणखी खडतर केलेली आहे. आगामी वर्षात होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड कष्ट उपसावे लागतील.
जिओ न्यूज (पाकिस्तान)
लोकसभा निवडणुकीपूर्वी हाती आलेले चार राज्यांचे निवडणूक निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा मोठा विजय आहे. सहा महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होतील, तेव्हा काय पिक्चर असेल, त्याचा हा निकाल म्हणजे ट्रेलर आहे.
The post भाजपच्या विधानसभा विजयाचे जगभर पडसाद! appeared first on पुढारी.
वॉशिंग्टन वृत्तसंस्था : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून बाजी मारली. या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानल्या जात असल्याने त्याबाबत परदेशी माध्यमांनीही ठळकपणे वृत्ते प्रसिद्ध केली. (Assembly election results) न्यूयॉर्क टाइम्स (अमेरिका) : भारतातील तीन मोठ्या राज्यांमध्ये विजय मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव वाढलेला असल्याचे स्पष्ट झाले …
The post भाजपच्या विधानसभा विजयाचे जगभर पडसाद! appeared first on पुढारी.