नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफाेड केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 4) मध्यरात्री ध्रुवनगरमधील खंडोबा मंदिर परिसरात टोळक्याने दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. अशा वाढत्या घटनांमुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ध्रुवनगर परिसरातील सुभाष जाधव यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये लावलेली स्विफ्ट कार (एमएच ०२ … The post नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.
#image_title

नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफाेड केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 4) मध्यरात्री ध्रुवनगरमधील खंडोबा मंदिर परिसरात टोळक्याने दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. अशा वाढत्या घटनांमुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ध्रुवनगर परिसरातील सुभाष जाधव यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये लावलेली स्विफ्ट कार (एमएच ०२ सीडब्लू ८९२२) या कारसह, गिरीश तिलनकर हुंडाई (एमएच ४१ व्ही ५२६१) या गाडीची काच फोडली आहे. पाण्याच्या टाकीमागे अशोक काळे यांची व्हॅन (एमएच १५ एफव्ही ७०६५) या गाडीच्या दोन्ही काचा फोडण्यात आल्या. तर याच परिसरातील एका भाजी विक्रीच्या दुकानाचीही तोडफोड करीत या भागात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटना समजताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी पथकासह पहाणी केली. यावेळी टवाळखोरांचा होणाऱ्या त्रासाबाबत या भागातील महिलांनी कारवाईची मागणी करण्यास सांगितले.
यापूर्वी ध्रुवनगर, सातपूर कॉलनी, जाधव संकुल या परिसरातही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच परिसरातील दोन ठिकाणी धुडगुस घालणाऱ्या, टवाळखोरांवर निंबाळकर यांनी धडक कारवाई केली होती. सदर प्रकरणातही ते कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील, माजी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे यांनी केली आहे.
वाहनाच्या काचा फोडताना चार टवाळखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, काचा फोडत दहशत निर्माण करणाऱ्या या टवाळखोरांवर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
The post नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफाेड केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 4) मध्यरात्री ध्रुवनगरमधील खंडोबा मंदिर परिसरात टोळक्याने दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. अशा वाढत्या घटनांमुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ध्रुवनगर परिसरातील सुभाष जाधव यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये लावलेली स्विफ्ट कार (एमएच ०२ …

The post नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.

Go to Source