आजच्या बंद आंदोलनावर आळंदीकर ग्रामस्थ ठाम

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत आळंदी ग्रामस्थांना विश्वस्तपदी डावलल्याने मंगळवार (दि. 5) पुकारण्यात आलेल्या आळंदी बंदबाबत आळंदीकर ठाम आहेत. संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवस्थानला मदत करण्याबाबत आळंदीकरांचे योगदानच काय असे वक्तव्य केले होते. यातून आळंदीकरांचा अपमान झाला असून, त्यांनी आळंदी ग्रामस्थांची माफी … The post आजच्या बंद आंदोलनावर आळंदीकर ग्रामस्थ ठाम appeared first on पुढारी.
#image_title

आजच्या बंद आंदोलनावर आळंदीकर ग्रामस्थ ठाम

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत आळंदी ग्रामस्थांना विश्वस्तपदी डावलल्याने मंगळवार (दि. 5) पुकारण्यात आलेल्या आळंदी बंदबाबत आळंदीकर ठाम आहेत. संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवस्थानला मदत करण्याबाबत आळंदीकरांचे योगदानच काय असे वक्तव्य केले होते. यातून आळंदीकरांचा अपमान झाला असून, त्यांनी आळंदी ग्रामस्थांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आळंदी ग्रामस्थांनी दिला.आळंदी पोलिस ठाण्यात ग्रामस्थ व पोलिस प्रशासन यांच्यात बैठक बोलवण्यात आली होती.
यामध्ये पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी आळंदीकर ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुर्‍हाडे, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे, अशोक उमरगेकर, साहेबराव कुर्‍हाडे, भाजपचे नेते संजय घुंडरे, नंदकुमार कुर्‍हाडे, विष्णू वाघमारे, राहुल चव्हाण, पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केलेल्या वक्तव्याने आळंदीकर ग्रामस्थांचा अपमान झाला आहे. त्यामुळे संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने पुकारण्यात आलेल्या आळंदी बंदवर ठाम असल्याचे पोलिस प्रशासनाला सांगितले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, प्रशांत कुर्‍हाडे, सागर भोसले, रमेश गोगावले, आनंदराव मुंगसे, शिरीष कारेकर, आरिफ शेख आदी उपस्थित होते.
असा असेल निषेध मोर्चा
सकाळी नऊ वाजता श्रीगुरु हैबतबाबा पायरी पूजनाने कार्तिकी यात्रास सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या सर्व धार्मिक विधींसाठी आळंदी ग्रामस्थांचा विरोध नाही. निषेध मोर्चा सकाळी दहा वाजता चाकण चौक येथून सुरू होऊन प्रदक्षिणा मार्गावरून महाद्वार चौकात येईल. या ठिकाणी निषेध सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल.
हेही वाचा

Pune News : रेल्वे स्थानकावरील सरकता जिना बंद; प्रवाशांचे हाल
विमानासारखी दिसणारी पर्स!
मनोर्‍याप्रमाणे झुकतोय 900 वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध टॉवर

The post आजच्या बंद आंदोलनावर आळंदीकर ग्रामस्थ ठाम appeared first on पुढारी.

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत आळंदी ग्रामस्थांना विश्वस्तपदी डावलल्याने मंगळवार (दि. 5) पुकारण्यात आलेल्या आळंदी बंदबाबत आळंदीकर ठाम आहेत. संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवस्थानला मदत करण्याबाबत आळंदीकरांचे योगदानच काय असे वक्तव्य केले होते. यातून आळंदीकरांचा अपमान झाला असून, त्यांनी आळंदी ग्रामस्थांची माफी …

The post आजच्या बंद आंदोलनावर आळंदीकर ग्रामस्थ ठाम appeared first on पुढारी.

Go to Source