पुणे : रेल्वे स्थानकावरील सरकता जिना बंद; प्रवाशांचे हाल
पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहा जवळील सरकता जिना सोमवारी दुपारी बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या वेळी प्रवाशांना साध्या जिन्यावरून अवजड बॅगा घेऊन आणि ज्येष्ठांना कसरत करत प्रवास करावा लागला. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वे प्रशासनामार्फत चार सरकते जिने बसविण्यात आले आहेत. यातीलच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 च्या दिशेला असलेले 2 सरकते जिने सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
या वेळी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला असता, ते म्हणाले, रेल्वेने देखभाल दुरुस्तीची कामे ही करायलाच हवी, मात्र, येथून ये-जा करण्यासाठी वेगळा पर्याय देखील असायला हवा. अनेक प्रवासी प्रवास करून थकतात. तर काही प्रवाशांना हृदयविकार आणि दम्यासारख्या आजारांचा त्रास असतो. अशावेळी जिने चढणे-उतरणे, त्यांच्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पर्याय उपलब्ध करून द्यावेत.
लवकरात लवकर लिफ्ट बसवा
दौंडसारख्या अनेक छोट्या-मोठ्या रेल्वे स्थानकांवर लिफ्टची सुविधा आहे. तसेच, पुण्यातील मेट्रो स्थानकांना देखील लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, पुणे रेल्वे स्थानकावर अद्यापपर्यंत लिफ्ट बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर येथे लिफ्टची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येथील सरकता जिना बंद करण्यात आला होता. पुणे रेल्वे स्थानकावरील लिफ्ट बसविण्याच्या कामाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली आहे. त्याच्या टेंडरींगचे काम लवकरात लवकर सुरू होईल.
– डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग
हेही वाचा
विमानासारखी दिसणारी पर्स!
अंतराळातही पोहोचणार चीन-रशियाची अमेरिकेशी रस्सीखेच
सांगली : कोयनेतील विसर्ग पुन्हा थांबणार
The post पुणे : रेल्वे स्थानकावरील सरकता जिना बंद; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहा जवळील सरकता जिना सोमवारी दुपारी बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या वेळी प्रवाशांना साध्या जिन्यावरून अवजड बॅगा घेऊन आणि ज्येष्ठांना कसरत करत प्रवास करावा लागला. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वे प्रशासनामार्फत चार …
The post पुणे : रेल्वे स्थानकावरील सरकता जिना बंद; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.