ग्रेनेडसारखी फळे देणारे झाड!
कॅलिफोर्निया : जगभरात अशी अनेक प्रकारची झाडे आहेत, ज्यांची एकापेक्षा एक अनोखी वैशिष्ट्ये आहेत. काही झाडांमध्ये अनेक लिटर पाणी जमलेले असू शकते तर काही झाडे अगदी वर्षभर फळे देणारी असू शकतात. ही झाडे प्रदीर्घ काळ जिवंत रहावीत, यासाठी त्यांना जणू दैवी देणगीही लाभलेली असते. आता बहुतांशी झाडे पृथ्वीला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. पण, याचवेळी काही झाडे अतिशय धोकादायकही असतात.
काही झाडे तर इतकी धोक्याची असतात की, त्यांच्यापासून केव्हाही शक्य तितके दूर राहणेच बेहत्तर असते. असेच एक झाड आहे सँड बॉक्स ट्री! ह्युरा क्रेप्टिन्स असे या झाडाचे शास्त्रीय नाव आहे. त्याला पोसमवूड, जाबिलो या नावानेही ओळखले जाते.
हे झाड उत्तर व दक्षिण अमेरिकेतील ट्रॉपिकल रिजनमध्ये आढळून येते. याशिवाय, अमेझॉन जंगलातही ते आढळते. मात्र, हे झाड जगातील सर्वात धोकादायक झाडांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे या झाडाला चक्क ग्रेनेडसारखी फळे लागतात. सँड बॉक्स जगभरातील सर्वात धोकादायक झाडांपैकी एक यासाठी आहे की, ते ग्रेनेडसारखी फळे देते. ही झाडे साठ मीटर लांब व त्याची पाने 60 सेंटीमीटर्सपर्यंत मोठी असू शकतात. या झाडांना दोन प्रकारची फुले येतात.
यातील एका प्रकारची फुले लांब काट्यांमध्ये येतात तर दुसर्या प्रकारची फुले पानांमध्ये उगवतात. या झाडाची फळे 5 मीटर्सपर्यंत मोठी असू शकतात आणि ती ग्रेनेडसारखी वाढत राहतात. ही ग्रेनेड अतिशय धोकादायक असतात आणि त्याच्यामुळे गंभीर जखमही होऊ शकते. त्यामुळे, या झाडापासून शक्य तितके दूर राहणेच बेहत्तर ठरत आले आहे.
The post ग्रेनेडसारखी फळे देणारे झाड! appeared first on पुढारी.
कॅलिफोर्निया : जगभरात अशी अनेक प्रकारची झाडे आहेत, ज्यांची एकापेक्षा एक अनोखी वैशिष्ट्ये आहेत. काही झाडांमध्ये अनेक लिटर पाणी जमलेले असू शकते तर काही झाडे अगदी वर्षभर फळे देणारी असू शकतात. ही झाडे प्रदीर्घ काळ जिवंत रहावीत, यासाठी त्यांना जणू दैवी देणगीही लाभलेली असते. आता बहुतांशी झाडे पृथ्वीला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. पण, याचवेळी काही झाडे …
The post ग्रेनेडसारखी फळे देणारे झाड! appeared first on पुढारी.