सेन्सेक्स आणि निफ्टीचा सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांक

पुढारी ऑनलाईन : सेसेन्सेक्स आणि निफ्टीने आज मंगळवारी (दि.५) सलग दुसऱ्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स आज सुरुवातीच्या व्यवहारात ३३४ अंकांनी वाढून ६९,२०० वर पोहोचला. तर निफ्टीने २०,७५२ चा टप्पा पार केला आहे. (Stock Market Updates)
बाजारातील चौफेर खरेदीत बँकिंग क्षेत्र आघाडीवर आहे. सेन्सेक्सवर एम अँड एम, एसबीआय, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले आहेत. दरम्यान, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, टाटा स्टील, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले आहे.
दरम्यान, आशियाई बाजारात सुस्ती दिसून येत आहे. तर काल अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मागणी कमी राहिल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात सुमारे २ टक्क्यांनी घसरण झाली आहे. कच्चे तेल प्रति बॅरल ७९ डॉलरच्या खाली आले आहे.
मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा, यूएस फेडरल रिझर्व्ह मार्चमध्ये व्याजदरात कपातीची शक्यता आणि राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा झालेला विजय यामुळे मागील सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन शिखर गाठले होते. आज मंगळवारी दोन्ही निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकांवर खुले झाले. (Stock Market Updates)
The post सेन्सेक्स आणि निफ्टीचा सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांक appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : सेसेन्सेक्स आणि निफ्टीने आज मंगळवारी (दि.५) सलग दुसऱ्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स आज सुरुवातीच्या व्यवहारात ३३४ अंकांनी वाढून ६९,२०० वर पोहोचला. तर निफ्टीने २०,७५२ चा टप्पा पार केला आहे. (Stock Market Updates) बाजारातील चौफेर खरेदीत बँकिंग क्षेत्र आघाडीवर आहे. सेन्सेक्सवर एम अँड एम, एसबीआय, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी …
The post सेन्सेक्स आणि निफ्टीचा सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांक appeared first on पुढारी.
