सातारा : हिवरे येथे भावंडांचा बुडून मृत्यू

सातारा/पिंपोडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : हिवरे, ता. कोरेगाव येथे रविवारी दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा बंधार्‍यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आईचा डोळा चुकवून ही भावंडे पोहोयला गेली होती. ऋतुराज रोहिदास गुजले (वय 14) आणि वेदांत रोहिदास गुजले (वय 10) अशी बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. ऋतुराज हा आठवीमध्ये तर वेदांत हा सहावीमध्ये शिकत … The post सातारा : हिवरे येथे भावंडांचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

सातारा : हिवरे येथे भावंडांचा बुडून मृत्यू

सातारा/पिंपोडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : हिवरे, ता. कोरेगाव येथे रविवारी दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा बंधार्‍यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आईचा डोळा चुकवून ही भावंडे पोहोयला गेली होती. ऋतुराज रोहिदास गुजले (वय 14) आणि वेदांत रोहिदास गुजले (वय 10) अशी बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.
ऋतुराज हा आठवीमध्ये तर वेदांत हा सहावीमध्ये शिकत होता. रविवारी शाळेला सुट्टी आणि त्यात किन्हई येथे बैलगाडा शर्यत असल्याने मुले तेथे जातील या भीतीने आईने दोघांनाही जांभळा या शिवारातील शेतात नेले होते. ऋतुराज आणि वेदांत ही भावंडे येथील बंधार्‍यात पोहत होते. त्यावेळी त्यांची आई तेथेच होती. आईने त्यांना बाहेर येण्यास सांगितल्यानंतर हे सर्व जण घरी गेले होते. त्यानंतर ही भावंडे आईचा डोळा चुकवून पुन्हा पोहायला गेली. सायंकाळी दोन्ही मुले सापडत नसल्याने आईची घाबरगुंडी उडाली. गावातील काही युवकांनी बंधार्‍यात उड्या मारून मुलांचा शोध घेतला. रात्री उशीरा ऋतुराज आणि वेदांत या दोघांचेही मृतदेह आढळून आले. यावेळी आई-वडील आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता. ऋतुराज याला पोहता येत होते. मात्र, वेदांत याला पोहता येत नव्हते. पोहता पोहता वेदांत याने ऋतुराजला मिठी मारली. या अवस्थेतच दोघांचेही मृतदेह सापडल्याने उपस्थित हेलावून गेले.

The post सातारा : हिवरे येथे भावंडांचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

सातारा/पिंपोडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : हिवरे, ता. कोरेगाव येथे रविवारी दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा बंधार्‍यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आईचा डोळा चुकवून ही भावंडे पोहोयला गेली होती. ऋतुराज रोहिदास गुजले (वय 14) आणि वेदांत रोहिदास गुजले (वय 10) अशी बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. ऋतुराज हा आठवीमध्ये तर वेदांत हा सहावीमध्ये शिकत …

The post सातारा : हिवरे येथे भावंडांचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source