जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची सक्तमजुरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील ६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजता अल्पवयीन मुलगी ही नैसर्गिक विधी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपी … The post जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.
#image_title

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची सक्तमजुरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील ६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजता अल्पवयीन मुलगी ही नैसर्गिक विधी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपी योगेश दिनकर कोळी याने तिच्या मागून येवून तिचे तोंड दाबत तिला एका जुन्या  घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.  जर तू ओरडली तर तुला जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता पीडित मुलगी घरी गेल्यावर. तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला.  आरोपी योगेश दिनकर कोळी यांच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरु होता. यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानुसार न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ताराचंद जावळे यांनी काम मदत केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय वकील सुरेंद्र कांबळे यांनी काम पाहिले.
हेही वाचा :

शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहणार : प्रकाश आंबेडकर
डोळ्यांचा नंबर सारखा बदलतोय, जाणून घ्या ‘केराटोकोनस’ व्याधीविषयी आणि त्यावरील उपचार
कोल्हापुरातील लोकसभेच्या एका जागेसाठी भाजप आग्रही

The post जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील ६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजता अल्पवयीन मुलगी ही नैसर्गिक विधी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपी …

The post जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Go to Source