मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याच्या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. पक्षात एकजूट कायम आहे, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्यक्त केला.
विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे. अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे. माध्यमेही त्याला प्रसिद्धी देत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, असे थोरात यांनी नमूद केले आहे.
The post ‘काँग्रेसफुटीच्या बातम्या खोट्या; पक्षात एकजूट कायम’ appeared first on पुढारी.
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याच्या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. पक्षात एकजूट कायम आहे, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्यक्त केला. विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे. अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे. माध्यमेही त्याला प्रसिद्धी देत आहेत, …
The post ‘काँग्रेसफुटीच्या बातम्या खोट्या; पक्षात एकजूट कायम’ appeared first on पुढारी.