पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे, चेन्नई हवामान केंद्राने मंगळवारी (दि.) सकाळी तामिळनाडूच्या दहा जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस, हलके वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. चेन्नई, तिरुवल्लूरमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Cyclone ‘Michaung’ Update)
Cyclone ‘Michaung’ Update : वादळामुळे 5 जणांचा मृत्यू
तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग देशाच्या दक्षिणेकडील राज्ये, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात कहर केला आहे. चेन्नईत वादळ आणि मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीजवळ आल्याने मुसळधार पावसामुळे चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर 12 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. तीव्र चक्रीवादळ मंगळवारी सकाळी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
Cyclone Michaung Update : चेन्नईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, मिचौंग चक्रीवादळाने पूरस्थिती
Terrorist Sajid Mir Poisoned : 26/11 हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीरवर पाकिस्तानच्या जेलमध्ये विषप्रयोग, प्रकृती गंभीर
The post ‘मिचॉन्ग’चा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात कहर, वादळामुळे 5 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे, चेन्नई हवामान केंद्राने मंगळवारी (दि.) सकाळी तामिळनाडूच्या दहा जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस, हलके वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. चेन्नई, तिरुवल्लूरमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Cyclone ‘Michaung’ Update) Cyclone ‘Michaung’ Update : वादळामुळे 5 जणांचा मृत्यू तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग देशाच्या दक्षिणेकडील राज्ये, तामिळनाडू आणि …
The post ‘मिचॉन्ग’चा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात कहर, वादळामुळे 5 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.