शिवनगर : ऊस उत्पादकांना येणार सोन्याचे दिवस

शिवनगर : ऊस उत्पादकांना येणार सोन्याचे दिवस

प्रा.अनिल धुमाळ

शिवनगर : सध्या देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेत वाढणारे दर तसेच ग्रीन बेस तथा मका किंवा खराब धान्यापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या दरात केंद्र शासनाने वाढ केली असून, उसापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सोन्याचे दिवस येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मागील गाळपात देशात एकूण साखरेचे उत्पादन 327 लाख मेट्रिक टन झाले होते, तर त्या वेळी 70 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक होती त्यामुळे एकूण साखर 397 लाख मेट्रिक टन उपलब्ध होती. अशावेळी त्या हंगामात निर्यात होणारी साखर 65 लाख मेट्रिक टन व वापरात लागणारी एकूण 275 लाख मेट्रिक टन साखर वजा जाता केवळ 57 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असल्याचे सूत्रांकडून समजते.
उसाचे घटलेले उत्पादन पाहता यंदाच्या गाळप हंगामात साखरेचे एकूण उत्पादन 280 ते 300 लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या साखरेचे दर 3,650 ते 3850 रुपये प्रतीक्विंटल असल्याचे दिसत आहे. साखर उत्पादनाची स्थिती पाहता या दरामध्ये फारसा बदल होईल असे दिसत नाही. जागतिक बाजारपेठेतील वाढत्या दरांमुळे साखर कारखानदारांकडून निर्यातीसाठी दबाव वाढल्यास आणि ती सुरू झाल्यास देशांर्गत साखरेचे दर आणखी वाढतील.
मका किंवा खराब धान्यापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या दरात शासनाने वाढ केली असून, उसापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत त्यामुळे भविष्यात साखरेसह इथॅनॉलचे वाढणारे दर पाहता ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सोन्याचे दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उसापासून निर्माण होणारे इथेनॉल शासन खरेदी करताना सी हेवी 49 रुपये लिटरप्रमाणे,बी हेवी 60 रुपये प्रतीलिटर, तर सिरपपासून तयार होणारे इथेनॉल 64 रुपये प्रतीलिटर विकत घेते, तेच इथेनॉल ग्राहकाला 106 रुपये प्रतीलिटर विकते अशावेळी शासनाने इथेनॉलच्या दरात 10 ते 12 रुपये प्रतीलीटर वाढ करावी.
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी.

हेही वाचा
सातारा : केटीएम गँगकडून १०३ तोळे सोने जप्त; ५ जणांना अटक
Crime News : टाकळीत विद्युत रोहित्राच्या चोरीचा पाडवा
Pimpri Crime News : दागिन्यांचे प्रदर्शन पडेल महागात
The post शिवनगर : ऊस उत्पादकांना येणार सोन्याचे दिवस appeared first on पुढारी.

शिवनगर : सध्या देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेत वाढणारे दर तसेच ग्रीन बेस तथा मका किंवा खराब धान्यापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या दरात केंद्र शासनाने वाढ केली असून, उसापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सोन्याचे दिवस येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील गाळपात देशात …

The post शिवनगर : ऊस उत्पादकांना येणार सोन्याचे दिवस appeared first on पुढारी.

Go to Source