Pune Drug Case : कारागृहाच्या वैद्यकीय अधिकार्‍यामुळे पलायन सोपे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काशिनाथ मरसाळे (वय 53) हा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांची वेळोवेळी भेट घेत होता. भेटीदरम्यान, बलकवडे याच्यासोबत व्हॉट्सअप व मोबाइलवर कॉल करून आरोपी ललित पाटील याला ससून रुग्णालय येथे उपचार करण्यास व पळून जाण्यास सोयीस्कर होण्याकरिता वेळोवेळी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले … The post Pune Drug Case : कारागृहाच्या वैद्यकीय अधिकार्‍यामुळे पलायन सोपे appeared first on पुढारी.
#image_title

Pune Drug Case : कारागृहाच्या वैद्यकीय अधिकार्‍यामुळे पलायन सोपे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काशिनाथ मरसाळे (वय 53) हा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांची वेळोवेळी भेट घेत होता. भेटीदरम्यान, बलकवडे याच्यासोबत व्हॉट्सअप व मोबाइलवर कॉल करून आरोपी ललित पाटील याला ससून रुग्णालय येथे उपचार करण्यास व पळून जाण्यास सोयीस्कर होण्याकरिता वेळोवेळी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील वैशाली रेड्डी यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्याला 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ललित पाटील हा चाकण येथील ड्रग्ज प्रकरणात 2020 पासून कारागृहात होता. 3 जून रोजी ललित पाटील आजारी असल्याचे कारण देऊन त्याची रवानगी ससून रुग्णलयातील वॉर्ड क्र. 16 मध्ये करण्यात आली होती. 1 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयाच्या गेटवरच दोन कोटींचे मॅफेड्रॉन विकत असताना ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यानंतर 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. यानंतर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणार्‍या भूषण पाटीलसह पोलिस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती.
तसेच 28 नोव्हेंबर रोजी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक करण्यात आली. सुधाकर इंगळे याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात डॉ. संजय मरसाळे यांचे नाव समोर आले. यानंतर अधिक तपास केला असता डॉ. संजय मरसाळे हे ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. ललित पाटील याला 3 जून रोजी येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. 1 ते 3 जून दरम्यान भूषण पाटील, अभिषेक बलकवडे आणि डॉ. संजय मरसाळे यांच्यात 19 वेळा फोनवरून संभाषण झाल्याचे तपासात समोर आले.
तसेच कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांनी अभिषेक बलकवडे याच्याकडून पैसे घेतले होते. यातील 20 हजार डॉ. संजय मरसाळे यांना देण्यात आले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. ललित पाटील याच्या आजारावर कारागृहात उपचार करणे शक्य असतानाही त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यासाठी डॉ. मरसाळे याने मदत केली होती. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील वैशाली रेड्डी यांनी केली.
पैसे घेऊन शिफारस केल्याची चर्चा
डॉ. संजय मरसाळे हे येरवडा कारागृहातील रुग्णालयात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. कैदी आजारी पडल्यानंतर ससून रुग्णालयात पाठविण्यासाठी डॉ. संजय मरसाळे यांच्या शिफारशीची गरज असते. डॉ. मरसाळे आजारी कैद्याला ससूनमध्ये पाठवू शकत होते. ड्रग्जतस्कर ललित पाटील याला पैसे घेऊन शिफारस केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा

Pue News : कात्रज चौकातील उड्डाणपुलाची लांबी वाढणार
पनौती नावाचं कॅम्पेन भाजपाने केले : नाना पटोले
विरोधकांनी पराभवाचा राग संसदेत काढू नये : पीएम मोदी

The post Pune Drug Case : कारागृहाच्या वैद्यकीय अधिकार्‍यामुळे पलायन सोपे appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काशिनाथ मरसाळे (वय 53) हा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांची वेळोवेळी भेट घेत होता. भेटीदरम्यान, बलकवडे याच्यासोबत व्हॉट्सअप व मोबाइलवर कॉल करून आरोपी ललित पाटील याला ससून रुग्णालय येथे उपचार करण्यास व पळून जाण्यास सोयीस्कर होण्याकरिता वेळोवेळी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले …

The post Pune Drug Case : कारागृहाच्या वैद्यकीय अधिकार्‍यामुळे पलायन सोपे appeared first on पुढारी.

Go to Source