20 टक्के वेतनासाठी शिक्षकांचे जि. प. कार्यालयासमोर उपोषण
पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोकुळनगरमधील राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह आठ शिक्षक 20 टक्के वेतनासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वेळ
काढूपणाने चार वर्षे वेतनापासून वंचित ठेवल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयास सरसकट 20 टक्के अनुदान प्राप्त आहे. सप्टेंबर 2016 पासून वेतन अदा करण्यात आले. मात्र, जानेवारी 2020 पासून कोणतीही पूर्वकल्पना न देता वेतन थांबविण्यात आले. गेली चार वर्षे वेतन मिळत नसल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक व शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षकांना वेतन अदा करण्याच्या आदेशांना शिक्षणाधिकारी यांच्याकडून कार्यवाही न करता केराची टोपली दाखवण्यात आल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे.
संबंधित शाळा शिक्षण मंडळ पुणे महापालिका कार्यक्षेत्रात येत असल्याने प्रशासकीय अधिकार्यांनी शिफारस करावी, अशी शिक्षणाधिका-यांनी मागणी केली. त्यानुसार शिक्षण मंडळ कार्यालयाने तुकड्या व शिक्षक मान्यता पडताळून तीन पत्रे देत वेतन अदा करण्याची शिफारस केली. परंतु, शिक्षणाधिकारी यांनी पुन्हा पत्र देत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती शिक्षण मंडळास दिली असून, शिक्षणाधिका-यांची कृती प्रामाणिक ज्ञानदानाचे काम करणार्या शिक्षकांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
शासन निर्णयानुसार पात्र 10 शिक्षकांना प्राथमिक शिक्षणाधिकारी पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून चुकीची, दिशाभूल करणारी माहिती प्रशासकीय अधिकारी शिक्षण मंडळ यांना देत आहेत. शिक्षण मंडळ यांनी शिफारस करूनही वंचित ठेवले जात आहे. चार वर्षे वेतन बंद केल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तत्काळ 6 नोव्हेंबर 2023 च्या पत्रानुसार पगार देण्यासाठी निर्देशित करावे.
– नागनाथ काळे, मुख्याध्यापक, राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय.
हेही वाचा
Pue News : कात्रज चौकातील उड्डाणपुलाची लांबी वाढणार
सिंधुदुर्ग : हवेत झेपावणारी विमाने अन् कमांडोंच्या थरारक कसरती
तगड्या पोलिस बंदोबस्तात, भिडे वाड्याचे सक्तीने भूसंपादन
The post 20 टक्के वेतनासाठी शिक्षकांचे जि. प. कार्यालयासमोर उपोषण appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोकुळनगरमधील राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह आठ शिक्षक 20 टक्के वेतनासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वेळ काढूपणाने चार वर्षे वेतनापासून वंचित ठेवल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयास सरसकट 20 टक्के अनुदान प्राप्त आहे. सप्टेंबर 2016 पासून वेतन अदा करण्यात आले. मात्र, जानेवारी …
The post 20 टक्के वेतनासाठी शिक्षकांचे जि. प. कार्यालयासमोर उपोषण appeared first on पुढारी.