राज्य मागास आयोग सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आरक्षणासंदर्भात मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू असताना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज आक्रमक झाला आहे; तर दुसरीकडे आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समितीचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी … The post राज्य मागास आयोग सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा appeared first on पुढारी.
#image_title

राज्य मागास आयोग सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आरक्षणासंदर्भात मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू असताना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज आक्रमक झाला आहे; तर दुसरीकडे आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समितीचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
वाढता हस्तक्षेप जातविरहित सर्वेक्षण करण्यास येत असलेली आडकाठी यासह इतर कारणांमुळे आयोगाचे सदस्य राजीनामा देत असल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी आयोगाचे सदस्य सोनवणे आणि अ‍ॅड. बालाजी सगर किल्लारीकर या दोघांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजीनामा देणार्‍या सदस्यांची संख्या तीन झाली आहे. याबाबत आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांनी राजीनामा दिला
असताना दुसरे सदस्य बालाजी सगर किल्लारीकर यांनी 1 डिसेंबर रोजी वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हाके यांनी 2 डिसेंबर रोजीच राजीनामा दिला असल्याची माहिती पुढे आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यापूर्वी प्रथम जातीनिहाय जनगनणा होऊन सर्व समाजाचे आर्थिक, सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व जातींचे सर्वेक्षण झाले पाहिजे, जेणेकरून आरक्षण देताना प्रत्यक्ष माहिती समोर येऊन तुलनात्मक अभ्यास करणे सोपे जाईल. समाजातील वंचित घटकापर्यंत लाभ मिळेल, असे मत आयोगाचे सदस्य अ‍ॅड. किल्लारीकर यांनी बैठकीत मांडले होते. परंतु, त्यांच्या मतावर निम्म्या सदस्यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे अ‍ॅड. किल्लारीकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.
हेही वाचा

तगड्या पोलिस बंदोबस्तात, भिडे वाड्याचे सक्तीने भूसंपादन
तीन राज्यांत भाजपची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल
26/11 चा सूत्रधार मीर याच्यावर विष प्रयोग

The post राज्य मागास आयोग सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आरक्षणासंदर्भात मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू असताना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज आक्रमक झाला आहे; तर दुसरीकडे आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समितीचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी …

The post राज्य मागास आयोग सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

Go to Source