26/11 चा सूत्रधार मीर याच्यावर विष प्रयोग

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : मुंबई 26/11 हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला साजीद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील डेरा गाझी खान मध्यवर्ती तुरुंगात विष प्रयोग करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर बनली आहे. मीर हा भारतासाठी मोस्ट वाँटेड असून, त्याला काही महिन्यांपूर्वी लाहोर मध्यवर्ती तुरुंगातून डेरा गाझी खान मध्यवर्ती तुरुंगात हलवण्यात आले होते. … The post 26/11 चा सूत्रधार मीर याच्यावर विष प्रयोग appeared first on पुढारी.
#image_title

26/11 चा सूत्रधार मीर याच्यावर विष प्रयोग

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : मुंबई 26/11 हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला साजीद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील डेरा गाझी खान मध्यवर्ती तुरुंगात विष प्रयोग करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर बनली आहे.
मीर हा भारतासाठी मोस्ट वाँटेड असून, त्याला काही महिन्यांपूर्वी लाहोर मध्यवर्ती तुरुंगातून डेरा गाझी खान मध्यवर्ती तुरुंगात हलवण्यात आले होते. विष प्रयोग केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआयने त्याला एअरलिफ्ट करून बहावलपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तो व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे.
तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, यादरम्यान ऑक्टोबर 2023 पासून तुरुंगातील एक स्वयंपाकी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जाळे टाकले आहे. मीर हा पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे. या दहशवादी संघटनाने 2008 साली हा दहशवादी कट मुंबईत रचला होता. त्यावेळी त्यांनी कामा रुग्णालय, कॅफे, रेल्वेस्थानक यासारख्या अनेक जागांवर हल्ला केला होता. यामध्ये 170 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सादर केला असता, चीनने नकाराधिकार (व्हेटो) वापरून त्यात खोडा घातला होता.
The post 26/11 चा सूत्रधार मीर याच्यावर विष प्रयोग appeared first on पुढारी.

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : मुंबई 26/11 हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला साजीद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील डेरा गाझी खान मध्यवर्ती तुरुंगात विष प्रयोग करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर बनली आहे. मीर हा भारतासाठी मोस्ट वाँटेड असून, त्याला काही महिन्यांपूर्वी लाहोर मध्यवर्ती तुरुंगातून डेरा गाझी खान मध्यवर्ती तुरुंगात हलवण्यात आले होते. …

The post 26/11 चा सूत्रधार मीर याच्यावर विष प्रयोग appeared first on पुढारी.

Go to Source