जंक्शन : द्राक्षबागेची खा. सुळेंकडून पाहणी

जंक्शन : द्राक्षबागेची खा. सुळेंकडून पाहणी

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : बोरी (ता.इंदापूर) येथील भेसळयुक्त रासायनिक खतामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. 13 ) भेट घेतली. नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी करून शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही,
असे सांगितले. भेसळयुक्त रासायनिक खतामुळे बोरी गावातील सुमारे 180 एकर द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी रासायनिक खत निर्मिती करणार्‍या जय किसान बायोकेमफर्ट एलएलपी या खतनिर्मिती करणार्‍या कंपनीचे मालक रणजित शिंदे व खत विक्री करणारे फार्म केअर दुकानाचे मालक योगेश शिंदे यांच्यावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सुळे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
या वेळी शेतकर्‍यांनी कृषी विभाागाचे अधिकारी सहकार्य करीत नाही. काही ठरावीक शेतकर्‍यांचे पंचनामे होत आहेत. सर्व शेतकर्‍यांचे पंचनामे केले नसल्याचे सांगितले. भेसळयुक्त खतनिर्मिती करणार्‍या कंपनीवर ठोस कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.
सुळे म्हणाल्या, शेतकर्‍यांच्या या प्रश्नात लक्ष घालणार आहे. शेतकर्‍यावर अन्याय होऊ देणार नाही. सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करा. पालकमंत्री व कृषिमंत्री यांच्याशी बोलून नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने शासकीयस्तरावर बैठक आयोजित केली जाईल. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष भारत शिंदे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुनील पवार, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अ‍ॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्यायचे विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ,छत्रपती साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, रामचंद्र शिंदे, संदीप शिंदे, सतीश शिंदे, हनुमंत धायगुडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा
सातारा : केटीएम गँगकडून १०३ तोळे सोने जप्त; ५ जणांना अटक
Pimpri Crime News : दागिन्यांचे प्रदर्शन पडेल महागात
Crime News : टाकळीत विद्युत रोहित्राच्या चोरीचा पाडवा
The post जंक्शन : द्राक्षबागेची खा. सुळेंकडून पाहणी appeared first on पुढारी.

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : बोरी (ता.इंदापूर) येथील भेसळयुक्त रासायनिक खतामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. 13 ) भेट घेतली. नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी करून शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगितले. भेसळयुक्त रासायनिक खतामुळे बोरी गावातील सुमारे 180 एकर द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रासायनिक खत निर्मिती करणार्‍या …

The post जंक्शन : द्राक्षबागेची खा. सुळेंकडून पाहणी appeared first on पुढारी.

Go to Source