धुळे: जिंदाल कंपनीच्या बनावट स्टील पट्टी कारखान्यावर छापा; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे: पुढारी वृत्तसेवा : छताचे पीओपी तयार करण्यासाठी लागणारे जिंदाल कंपनीची बनावट स्टील पट्टी तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने सील केला. यावेळी २४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
धुळ्याच्या चाळीसगाव रोड परिसरातील शंभर फुटी रस्त्यालगत स्मार्ट स्टील या दुकानांमध्ये छताच्या पीओपी साठी लागणारे साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. या साहित्यपैकी स्टील दर्जा असणाऱ्या पत्र्याचा वापर करून जिंदाल कंपनीचा छापील बनावट शिक्का मारून स्टीलची पट्टी तयार केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक धिवरे यांच्यासह पथकातील निरीक्षक धीरज महाजन, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक अमरजीत मोरे ,मच्छिंद्र पाटील, संदीप सरक, शोएब बेग, राजू गीते यांनी या दुकानावर छापा मारला.
यावेळी या दुकानात स्टीलची पट्टी तयार करण्याचे एक मशीन आढळून आले. या मशीनवर जिंदाल कंपनीचा शिक्का मारण्याची यंत्र आढळून आली. एका मशीनद्वारे पत्र्यावर पीओपी ला लागणाऱ्या पट्टीचा आकार देऊन त्यावर नीलकमल कंपनीच्या प्रिंटरने जिंदाल अशा नावाची छपाई केली जाऊन या पट्टीची कटिंग होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुकानाचे मालक मुखतार खान, शहजाद खान यांना या छपाईच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याची बाब निदर्शनास आली.
तसेच सध्या जिंदाल कंपनीच्या या साहित्याला बाजारात मागणी असल्याने प्रिंटरच्या माध्यमातून अशी छपाई होत असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले. त्यामुळे मुखतार खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून मशीनसह २४ लाख ३२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा
Jalgaon News: पारोळा – धुळे मार्गावर तीन वाहनांचा अपघात; ३ महिलांचा मृत्यू; २१ जखमी
धुळे : विमा कंपनीच्या मनमानी विरोधात निवेदन; ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा
धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
The post धुळे: जिंदाल कंपनीच्या बनावट स्टील पट्टी कारखान्यावर छापा; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.
धुळे: पुढारी वृत्तसेवा : छताचे पीओपी तयार करण्यासाठी लागणारे जिंदाल कंपनीची बनावट स्टील पट्टी तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने सील केला. यावेळी २४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. धुळ्याच्या चाळीसगाव रोड परिसरातील शंभर …
The post धुळे: जिंदाल कंपनीच्या बनावट स्टील पट्टी कारखान्यावर छापा; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.