परिणीतीचे १५ किलो वजन वाढले! आता कमी करण्यासाठी गाळतेय घाम
पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्राने जिममधून वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप घाम गाळताना दिसत आहे. परिणीती चोप्राने या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, तिचं १५ किलो वजन कसं वाढलं आणि काय होते , तिचे डेली रुटीन? (Parineeti Chopra) आता वजन घटवण्यासाठी तिला जिममध्ये घाम गाळतेय. (Parineeti Chopra)
संबंधित बातम्या –
अप्पी आमची कलेक्टर मालिकेत येणार नवं ट्विस्ट, डोहाळे जेवणाची जोरदार तयारी
Koffee With Karan 8 : लग्नाबद्दल कियाराचा मोठा खुलासा; सिद्धार्थविषयी म्हणाली…
Randeep Hooda-Lin Laishram Reception : रणदीप हुडाचे यादिवशी ग्रँड रिसेप्शन
सप्टेंबरमध्ये राघव चड्ढा यांच्यासोबत ती लग्नबंधनात अडकली होती. परिणीती चोप्रा आता संसारात बिझी आहे. दरम्यान, ती जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. कारण आहे-तिचे वाढलेले वजन. तिचे तब्बल १५ किलो वजन वाढले असून आता कमी करण्यासाठी ती जिममध्ये घाम गाळतेय. परिणीती चोप्राने आपल्या या पोस्टमध्ये वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि सोबतच तिने मोठी पोस्ट लिहून सांगितले की, तिचे इतके वजन कसे वाढले?
परिणिती सध्या खूप कठीण वर्कआऊट करत आहे. परिणीतीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आपल्या वाढलेल्या वजनाबद्दल लिहिले आहे, ‘यावर्षी मी ६ महिने रहमान सरांच्या स्टुडिओमध्ये गाणी गाऊन घालवले आहेत. आणि मग मला घरी पाठवण्यात आले. चमकीलासाठी १५ किलो वजन वाढवण्यासाठी जितकं शक्य होईल तेवढं जंक फूड खाऊ शकेन.’
परिणीतीने लिहिलं की, ‘चमकीला’ लवकरचं नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
परिणीतीने पुढे म्हटलंय-संगीत आणि अन्न, बस इतकंच तिच्या रुटीनचा भाग बनलाय. आता चित्रपट तयार झाला आहे तर कहाणी एकदम उलट झाली आहे. मला स्टुडिओची आठवण येते आणि मी जिममध्ये राहून पुन्हा पहिल्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करत आहे. हे खूप कठीण होतं, पण तुमच्यासाठी आणि या बूमिकेसाठी काहीही करू शकते. इम्तियाज सर.’
View this post on Instagram
A post shared by @parineetichopra
The post परिणीतीचे १५ किलो वजन वाढले! आता कमी करण्यासाठी गाळतेय घाम appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्राने जिममधून वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप घाम गाळताना दिसत आहे. परिणीती चोप्राने या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, तिचं १५ किलो वजन कसं वाढलं आणि काय होते , तिचे डेली रुटीन? (Parineeti Chopra) आता वजन घटवण्यासाठी तिला जिममध्ये घाम गाळतेय. (Parineeti Chopra) संबंधित बातम्या – अप्पी …
The post परिणीतीचे १५ किलो वजन वाढले! आता कमी करण्यासाठी गाळतेय घाम appeared first on पुढारी.