जळगाव : लॉजवर छापा टाकून ५ परप्रांतीय तरूणींची सुटका: दोघांना अटक
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून ५ परप्रांतीय तरुणींची सुटका केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत हॉटेल व लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाने रविवारी सायंकाळी हॉटेल व लॉजवर छापा टाकून पश्चिम बंगाल येथील पाच तरुणींची सुटका केली. तर सागर नारायण सोनवणे आणि शाम विश्वास बोरसे (रा. जळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.
हेही वाचा
जळगाव: मनोज जरांगे-पाटील यांना महिलेने दिले रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र
जळगावातील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणातील चार नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र
The post जळगाव : लॉजवर छापा टाकून ५ परप्रांतीय तरूणींची सुटका: दोघांना अटक appeared first on पुढारी.
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून ५ परप्रांतीय तरुणींची सुटका केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत हॉटेल व लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने रविवारी सायंकाळी हॉटेल व लॉजवर छापा …
The post जळगाव : लॉजवर छापा टाकून ५ परप्रांतीय तरूणींची सुटका: दोघांना अटक appeared first on पुढारी.