इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली!
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन-2023’ मध्ये 30 हजार 370 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ चे यंदाही आयोजन करण्यात आले होते. ‘आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी’ हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलिस आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल 30 हजार 370 हून अधिक सायकलपटूंनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी ‘रिव्हर सायक्लोथॉन टीम’ ने ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. त्याचे प्रमाणपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, कुस्तीपटू नरसिंह यादव यांच्यासह महापालिका, पोलिस अधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, एव्हढ्या सकाळी नागरिक नदी स्वच्छता देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सायलिंगसाठी काम करीत आहे. प्रशासनाला यावर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे योगदान महत्त्वाचे आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी ‘रिव्हर सायक्लॉथॉन’ची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आमदार महेश लांडगे यांचे अभिनंदन करतो. सर्व संस्था, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींमुळे पिंपरी-चिंचवडचे नाव जगभरात करणारे आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणार्या सायकलपटूंचे कौतूक करतो. आरोग्यदायी जीवनासाठी सायकलपटूंनी सातत्य ठेवावे. 5, 15 आणि 15 किलोमीटर स्पर्धा होत आहेत. पुढील वर्षी 35 किमी लांब सायकल रॅली स्पर्धा करावी, अशी अपेक्षाही चौबे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
लसणाचे दर आवाक्याबाहेर ; प्रतिकिलो चारशे रुपयांपर्यंत दर
Raghav Chadha | आप खासदार राघव चड्ढा यांना मोठा दिलासा; राज्यसभेतील निलंबन मागे
The post इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! appeared first on पुढारी.
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन-2023’ मध्ये 30 हजार 370 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ चे यंदाही आयोजन करण्यात आले होते. ‘आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी’ हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. …
The post इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! appeared first on पुढारी.