आप खासदार राघव चड्ढा यांना मोठा दिलासा; राज्यसभेतील निलंबन मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पक्षाचे राज्‍यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्‍यात आले आहे. विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी वरिष्ठ सभागृहातून त्‍यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान खासदार चड्ढा यांनी स्वत: व्हिडिओ ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.  (Raghav Chadha) दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने आप खासदार राघव चड्ढा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली … The post आप खासदार राघव चड्ढा यांना मोठा दिलासा; राज्यसभेतील निलंबन मागे appeared first on पुढारी.
#image_title

आप खासदार राघव चड्ढा यांना मोठा दिलासा; राज्यसभेतील निलंबन मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पक्षाचे राज्‍यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्‍यात आले आहे. विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी वरिष्ठ सभागृहातून त्‍यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान खासदार चड्ढा यांनी स्वत: व्हिडिओ ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.  (Raghav Chadha)
दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने आप खासदार राघव चड्ढा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली होती. आज (दि.४) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राघव चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे ते सध्याच्या अधिवेनात सहभागी होत भाग घेऊ शकतात, असे राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी स्पष्ट केले आहे. (Raghav Chadha)

AAP leader Raghav Chadha’s Rajya Sabha membership revoked
Read @ANI Story | https://t.co/dsm4TtumfX#raghavchadha #RajyaSabha #AAP pic.twitter.com/WdeUUYioh6
— ANI Digital (@ani_digital) December 4, 2023

Raghav Chadha: खासदार राघव चड्ढा यांनी मानले आभार
आप खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे की, “११ ऑगस्ट रोजी मला राज्यसभेतून निलंबित करण्यात आले हाेते. निलंबन मागे घेण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली. आता ११५ दिवसांनी माझे निलंबन मागे घेण्यात आले आहे. माझे निलंबन रद्द करण्यात आले याचा मला आनंद आहे. मी सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांचे आभार मानताे.”

#WATCH | AAP MP Raghav Chadha says “On 11th August, I was suspended from the Rajya Sabha. I went to the Supreme Court for the revocation of my suspension. Supreme Court took cognizance of this and now my suspension has been revoked after 115 days…I am happy that my suspension… https://t.co/y3Lx9d8tdH pic.twitter.com/QPMf8iKSyD
— ANI (@ANI) December 4, 2023

Raghav Chadha Moves SC: कारवाई का?
राघव चड्ढा यांच्यावर खासदारांचा समावेश असलेल्या समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव त्यांच्या मंजुरीशिवाय ठेवल्याचा आरोप आहे, जे नियमांचे उल्लंघन केले. तसेच  दिल्ली सेवा विधेयकाबाबत पाच खासदारांच्या खोट्या सह्या केल्याचा आरोप खासदार चड्ढा यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली होती. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी राघव चड्ढा यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विशेषाधिकार समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि या संदर्भातील निर्णय देईल असे म्हटले होते. समितीचा अहवाल येईपर्यंत राघव चड्ढा राज्यसभेतून निलंबित राहणार होते. दरम्यान विशेषाधिकार समितीच्या निर्णयानंतर आज(दि.४) आप खासदार राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
हेही वाचा:

Maharashtra politics : अशिष शेलारांनी घातलं गाऱ्हाणं, “त्यांचीच पनवती…”
Monica Rajale : मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : आमदार मोनिका राजळे
Mizoram Election Result 2023 : मिझोरममध्येही सत्तांतर; झोरम पीपल्सची निर्णायक आघाडी

The post आप खासदार राघव चड्ढा यांना मोठा दिलासा; राज्यसभेतील निलंबन मागे appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पक्षाचे राज्‍यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्‍यात आले आहे. विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी वरिष्ठ सभागृहातून त्‍यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान खासदार चड्ढा यांनी स्वत: व्हिडिओ ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.  (Raghav Chadha) दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने आप खासदार राघव चड्ढा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली …

The post आप खासदार राघव चड्ढा यांना मोठा दिलासा; राज्यसभेतील निलंबन मागे appeared first on पुढारी.

Go to Source