Nashik Crime : अवैध धंद्यांवर कारवाई, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त
नाशिक : गौरव अहिरे
ग्रामीण पाेलिसांनी ६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कारवाई करीत दोन कोटी १० लाख ३८ हजार ९७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात सर्वाधिक ९८ लाख ७८ हजार २०४ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी ५५६ गुन्हे दाखल करून ७५४ संशयितांची धरपकड केली.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार, ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र गुन्हे शोध पथके कार्यरत करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येते. चांदवड शहरातून मुंबई-आग्रा महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकमध्ये असलेला ५० लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. त्यातील दोन संशयितांच्या अधिक चौकशीत एकूण 70 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, या स्वरूपाची कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश अधीक्षक उमाप यांनी पथकांना दिले आहेत.
गुन्हे आणि कारवाई
कारवाई
गुन्हे
संशयित
मुद्देमाल (किंमत रुपयांत)
गुटखा
93
99
98,78,204
दारूबंदी
343
348
44,98,867
जुगार
87
260
16,85,411
प्राणी संरक्षण
19
28
41,96,500
जीवनावश्यक वस्तू
10
15
7,50,500
एनडीपीएस
4
4
29,945
एकूण
556
754
2,10,38,977
नोव्हेंबर महिन्यात अवैध धंद्यांसह बेशिस्त वाहनचालकांवरही कारवाई केली. चार हजार ४४२ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३१ लाख ३३ हजार साठेआठशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. कारवाई कायम राहणार आहे. नागरिकांनीही ६२६२२५६३६३ या हेल्पलाइन क्रमांकावर अवैध धंद्यांसह गैरप्रकारांची माहिती द्यावी.
– शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
हेही वाचा :
Mizoram Election Result 2023 : मिझोरममध्येही सत्तांतर; झोरम पीपल्सची निर्णायक आघाडी
कोल्ह्याच्या पाच नवजात पिलांंना जीवदान
Market update : पुण्यात फळभाज्यांतील स्वस्ताई टिकून
The post Nashik Crime : अवैध धंद्यांवर कारवाई, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.
ग्रामीण पाेलिसांनी ६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कारवाई करीत दोन कोटी १० लाख ३८ हजार ९७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात सर्वाधिक ९८ लाख ७८ हजार २०४ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी ५५६ गुन्हे दाखल करून ७५४ संशयितांची धरपकड केली. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार, ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली जात …
The post Nashik Crime : अवैध धंद्यांवर कारवाई, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.