‘मिचौंग’ चक्रीवादळ उद्या द. आंध्रच्या किनारपट्टीला धडकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क  : चक्रीवादळ मिचौंग हे सध्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असून, ते हळूहळू दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकरत आहे. दरम्यान, आज (दि.4) सायंकाळी ‘मिचौंग’ द. आंध्रप्रदेश आणि उ. तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडणार आहे. दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘मिचौंग’ धडकणार आहे. दरम्यान तमिळनाडूसह, चेन्नईतील बहुतांशी भागावर चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. … The post ‘मिचौंग’ चक्रीवादळ उद्या द. आंध्रच्या किनारपट्टीला धडकणार appeared first on पुढारी.
#image_title
‘मिचौंग’ चक्रीवादळ उद्या द. आंध्रच्या किनारपट्टीला धडकणार


पुढारी ऑनलाईन डेस्क  : चक्रीवादळ मिचौंग हे सध्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असून, ते हळूहळू दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकरत आहे. दरम्यान, आज (दि.4) सायंकाळी ‘मिचौंग’ द. आंध्रप्रदेश आणि उ. तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडणार आहे. दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘मिचौंग’ धडकणार आहे. दरम्यान तमिळनाडूसह, चेन्नईतील बहुतांशी भागावर चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. तामिळनाडू आणि चेन्नईत मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागांत पाणी साचल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Cyclone Michaung Live Updates)
चेन्नईत पूरस्थिती, तर आंध्रप्रदेशात सतर्कतेचा इशारा
चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आल्याने चेन्नईत मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचले आहे. विमानसेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. काही भागात पुराचे पाणी साचल्याने अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या असल्याचे दृश्य दिसत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यात देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा देत  पुढील २ दिवस सुट्टी जाहीर केली आहे. पुढील २४ तास आंध्र प्रदेशातील नेल्लोर, गुंटूर, एनटीआर, कृष्णा, पश्चिम गोदावरी, तसेच तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Cyclone Michaung Live Updates)

#UPDATE | Airfield closed for arrival and departure operations till 2300 hrs IST today due to severe weather conditions.#ChennaiRains #CycloneMichuang #ChennaiAirport@AAI_Official | @MoCA_GoI | @pibchennai
— Chennai (MAA) Airport (@aaichnairport) December 4, 2023

🔴#CycloneMichaung | Extremely heavy rainfall has caused waterlogging, swept cars away in Chennai.
Visuals from Pallikaranai area. pic.twitter.com/v2ghGtdpus
— NDTV (@ndtv) December 4, 2023

‘मिचौंग’ आज द. आंध्र प्रदेश आणि उ. तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडणार
रविवारी(दि.३) सायंकाळी नैऋत्य बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ निर्माण झाले. त्यानंतर या वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून, मध्यम स्वरूपाच्या वेगाने ते पुढे सरकत आहे. आज (दि.४) सायंकाळी हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूची किनारपट्टी ओलांडणार आहे. याचा प्रभाव तमिळनाडूतील चेन्नईत शहर प्रभावाखाली आहे. कालपासून चेन्नईतील बहुतांशी भागात मुसळधआर ते अतिमुसळधार सुरू असून अनेक भागात पावसामुळे पूर आला आहे.
Cyclone Michaung Live Updates: ‘मिचौंग’ आंध्रच्या किनाऱ्याला धडकणार
मिचौंगचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. दरम्यान आज (दि.४) हे चक्रीवादळ चेन्नईपासून सुमारे ९० किमी आणि पुद्दुचेरीपासून २०० किमी अंतरावर होते. चक्रीवादळ आज (दि.४) सायंकाळी ५.३० च्या दरम्यान मच्छलीपट्टणमच्या आग्नेयला ३३० किमी अंतरावर असणार आहे. तसेच मंगळवारी (दि.५) दुपारी मिचौंग चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनार्‍यावर लँडफॉल होण्याची शक्यता आहे. दरम्यान किनारपट्टीलगत ९०-१०० ते ११० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा:

cyclone michaung live: ‘मिचौंग’ चक्रीवादळ; तमिळनाडूसह चेन्नईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Cyclone Michaung | ‘मिचॉन्ग’ आंध्र किनाऱ्यावर धडकणार; पीएम मोदींचे जगन मोहन रेड्डींना मदतीचे आश्वासन
Cyclone Michaung | पुढील २४ तासांत ‘मिचौंग’ आणखी तीव्र होणार; ‘या’ राज्यात मुसळधार

 
The post ‘मिचौंग’ चक्रीवादळ उद्या द. आंध्रच्या किनारपट्टीला धडकणार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क  : चक्रीवादळ मिचौंग हे सध्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असून, ते हळूहळू दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकरत आहे. दरम्यान, आज (दि.4) सायंकाळी ‘मिचौंग’ द. आंध्रप्रदेश आणि उ. तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडणार आहे. दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘मिचौंग’ धडकणार आहे. दरम्यान तमिळनाडूसह, चेन्नईतील बहुतांशी भागावर चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. …

The post ‘मिचौंग’ चक्रीवादळ उद्या द. आंध्रच्या किनारपट्टीला धडकणार appeared first on पुढारी.

Go to Source