Pune : पावसाच्या तडाख्याने द्राक्षांची मोठी आवक
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्षाच्या बागांना बसला आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (दि. 3) द्राक्षांची आवक वाढल्याचे दिसून आले पुणे जिल्ह्यासह सोलापूर भागातून चार ते साडेचार टन द्राक्षे विक्रीसाठी दाखल झाली. यामध्ये, पावसाच्या तडाख्यामुळे दर्जाहीन द्राक्षांचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली. रविवारी बाजारात द्राक्षांच्या दहा किलोला 500 ते 1200 रुपये दर मिळाला. तर, दर्जाहीन द्राक्षांचे दर अन्य द्राक्षांच्या तुलनेत निम्म्यावर आल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
मागणीअभावी डाळिंब, सीताफळ, पेरूच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळांची आवक- जावक कायम असल्याने गत आठवड्याच्या तुलनेत दर टिकून होते. फळबाजारात रविवारी केरळ येथून अननस 8 ट्रक, मोसंबी 50 ते 60 टन, संत्रा 30 ते 40 टन, डाळिंब 40 ते 45 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबांची सुमारे 1500 ते 2000 गोणी, कलिंगड 3 ते 4 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, सीताफळ 30 ते 35 टन, सफरचंद 2500-300 बॉक्स, चिक्कू 1 हजार बॉक्स आणि बोरांची 1000 ते 1200 गोणी इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 150-400, मोसंबी : (3 डझन): 180-350, (4 डझन) : 100-200, संत्रा : (10 किलो) : 200-700, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 40-160, गणेश : 10-30, आरक्ता 10-60, कलिंगड : 8-13, खरबूज : 18-30, पपई : 10-25, चिक्कू (दहा किलो) : 100-500. सीताफळ (एक किलो): 10-60, पेरु (वीस किलो) 300-500, बोरे (दहा किलो) चमेली : 180-230, उमराण : 80-120, चेकटन : 450-550, चण्यामण्या: 500-650, सफरचंद – काश्मीर डेलिशियस: (15 ते 16 कीलो) : 1500-1800, किनोर (25 ते 30 किलो) : 3000-4000.
The post Pune : पावसाच्या तडाख्याने द्राक्षांची मोठी आवक appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्षाच्या बागांना बसला आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (दि. 3) द्राक्षांची आवक वाढल्याचे दिसून आले पुणे जिल्ह्यासह सोलापूर भागातून चार ते साडेचार टन द्राक्षे विक्रीसाठी दाखल झाली. यामध्ये, पावसाच्या तडाख्यामुळे दर्जाहीन द्राक्षांचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली. रविवारी बाजारात द्राक्षांच्या दहा किलोला …
The post Pune : पावसाच्या तडाख्याने द्राक्षांची मोठी आवक appeared first on पुढारी.