Market update : पुण्यात फळभाज्यांतील स्वस्ताई टिकून
पुणे : ढगाळ वातावरणामुळे फळभाज्यांसाठी पोषक वातावरण तयार होऊन उत्पादनात वाढ झाल्याने पुणे कृषी उत्पन्न समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बहुतांश फळभाज्यांची वाढलेली आवक कायम आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाला मागणीही चांगली असल्याने फळभाज्यांचे गत आठवड्यातील दरही टिकून आहेत. रविवारी (दि. 3) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 9 ते 10 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 5 ते 6 टेम्पो, भुईमुग शेंग कर्नाटक येथून 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून 18 ट्रक मटार, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 आणि कैरी 700-800 गोणी, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 9 ते 10 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, टोमॅटो सुमारे आठ ते दहा हजार क्रेट्स, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, पावटा 6 ते 7 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा जूना आणि नवीन सुमारे 70-80 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 टेम्पो आवक झाली.
कोथिंबीर, मुळा झाला महाग
तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथी, कांदापात, राजगिरा व चवळईचे भाव उतरले आहेत. रविवारी (दि. 3) कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी, तर मेथीची 1 लाख जुडी इतकी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 25 हजार जुड्यांनी घटली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने कोथिंबीर व मुळ्याच्या भावात किंचितशी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. घाऊक बाजारात पालेभाजीच्या एका जुडीला 3 ते 15 रुपये दर मिळाला, तर किरकोळ बाजारात 5 ते 30 रुपये गड्डी या दराने पालेभाज्यांची विक्री झाली.
हेही वाचा :
Winter Session of Parliament: तीन राज्यांमधील पराभवाचा राग सभागृहात काढू नका : PM मोदींचा विराेधकांना टोला
Pune : प्रभू श्रीराम शिल्पाची पायाभरणी
The post Market update : पुण्यात फळभाज्यांतील स्वस्ताई टिकून appeared first on पुढारी.
पुणे : ढगाळ वातावरणामुळे फळभाज्यांसाठी पोषक वातावरण तयार होऊन उत्पादनात वाढ झाल्याने पुणे कृषी उत्पन्न समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बहुतांश फळभाज्यांची वाढलेली आवक कायम आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाला मागणीही चांगली असल्याने फळभाज्यांचे गत आठवड्यातील दरही टिकून आहेत. रविवारी (दि. 3) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये …
The post Market update : पुण्यात फळभाज्यांतील स्वस्ताई टिकून appeared first on पुढारी.