मंगोलियात रक्तासारखे लाल झाले आकाश!

बीजिंगः सूर्योदय किंवा सूर्यास्तावेळी आकाशात लाल, केशरी रंगांची उधळण होत असताना आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, भल्या पहाटेचा अंधार असताना आकाश रक्तासारखे लाल झालेले पाहणे हा एक अनोखा अनुभव आहे. मंगोलियात नुकताच लोकांनी हा थरारक अनुभव घेतला. अर्थात ही काही भयचकीत करणारी घटना नाही. हा लाल प्रकाश होता ‘ऑरोरा’ किंवा ‘नॉर्दन लाईटस्’चा. एरवी नॉर्वे, अमेरिकेतील … The post मंगोलियात रक्तासारखे लाल झाले आकाश! appeared first on पुढारी.
#image_title

मंगोलियात रक्तासारखे लाल झाले आकाश!

बीजिंगः सूर्योदय किंवा सूर्यास्तावेळी आकाशात लाल, केशरी रंगांची उधळण होत असताना आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, भल्या पहाटेचा अंधार असताना आकाश रक्तासारखे लाल झालेले पाहणे हा एक अनोखा अनुभव आहे. मंगोलियात नुकताच लोकांनी हा थरारक अनुभव घेतला. अर्थात ही काही भयचकीत करणारी घटना नाही. हा लाल प्रकाश होता ‘ऑरोरा’ किंवा ‘नॉर्दन लाईटस्’चा. एरवी नॉर्वे, अमेरिकेतील अलास्का, कॅनडामधून किंवा ब्रिटनसारख्या काही देशांमधून अशा ऑरोराची छायाचित्रे समोर येत असतात. मात्र, आता मंगोलियातील या छायाचित्राने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला ज्यावेळी सौरकण धडकतात त्यावेळी ध्रुवीय परिसरातील आसमंतात असा प्रकाशाचा खेळ रंगत असतो. आता शुक्रवार आणि शनिवारी पहाटे असा ऑरोरा मंगोलियात पाहायला मिळाला. ऑरोराचा रंग बर्‍याच वेळा हिरवा, निळसर असतो; मात्र कधी कधी तो लाल-केशरीही दिसतो.
असा लाल प्रकाश अतिशय दुर्मीळ असतो. तीव्र सौर हालचालींना या लाल रंगाचे कारण मानले जाते. 27 नोव्हेंबरला सूर्यामधून मोठ्या प्रमाणात भारीत कण उत्सर्जित झाले होते. 29 नोव्हेंबरला हे कण पहिल्यांदा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकले. पृथ्वीपासून 241 किलोमीटर उंचीवर ऑक्सिजनशी क्रिया होऊन लाल रंगाचा प्रकाश निर्माण झाला. यापूर्वी सन 1859 मध्ये मेक्सिकोपर्यंतही असा लाल प्रकाश दिसला होता. त्यावेळी सर्वात तीव्र सौर वादळ धडकले होते.
The post मंगोलियात रक्तासारखे लाल झाले आकाश! appeared first on पुढारी.

बीजिंगः सूर्योदय किंवा सूर्यास्तावेळी आकाशात लाल, केशरी रंगांची उधळण होत असताना आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, भल्या पहाटेचा अंधार असताना आकाश रक्तासारखे लाल झालेले पाहणे हा एक अनोखा अनुभव आहे. मंगोलियात नुकताच लोकांनी हा थरारक अनुभव घेतला. अर्थात ही काही भयचकीत करणारी घटना नाही. हा लाल प्रकाश होता ‘ऑरोरा’ किंवा ‘नॉर्दन लाईटस्’चा. एरवी नॉर्वे, अमेरिकेतील …

The post मंगोलियात रक्तासारखे लाल झाले आकाश! appeared first on पुढारी.

Go to Source