पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोरममध्ये चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बहुमत मिळाले आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ७ जागांसह पिछाडीवर आहे. ZPM ने २९ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. राज्यात ZPM कडे MNF चे प्रमुख आव्हान म्हणून पाहिले जात आहे. ZPM ला २०१९ मध्ये राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.
संबंधित बातम्या :
छत्तीसगडमध्ये विजय बघेल, रमणसिंग मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत
”आजच्या हॅट्रिकने २०२४ मध्ये भाजपच्या हॅट्रिकची गॅरंटी” : पीएम मोदी
निवडणूक निकालांनंतर काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण, ६ डिसेंबरला बोलावली बैठक
तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले रेवंत रेड्डी कोण आहेत?
१९७२ मध्ये, मिझोरम, आसाममधून वेगळे केले गेले. सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश तर १९८७ मध्ये मिझोरमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. तेव्हापासून, राज्याच्या राजकारणावर काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट (MNF) यांचे वर्चस्व आहे. काँग्रेसचे नेतृत्व दीर्घकाळ पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले लाल थनहवला यांच्याकडे होते. यावेळी काँग्रेसने तीन वेळा आमदार आणि माजी अर्थमंत्री राहिलेल्या लालसावता यांच्याकडे नेतृत्व सोपवलं आहे. लालसावता हे MNF च्या झोरामथांगा यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत. MNF ची स्थापना १९५५ मध्ये झाली. १९८६ पासून, MNF आणि कॉंग्रेस प्रत्येकी दोन दशके सत्तेत आहेत. प्रादेशिक किंवा इतर कोणताही पक्ष या दोघांना हटवू शकला नाही.
चार वर्षांपूर्वी ZPM चा उदय
या निवडूकीत कमाल केलेला झोराम पीपल्स मूव्हमेंट पक्ष चार वर्षांपूर्वी उदयास आला. याचे नेतृत्व निवृत्त आयपीएस अधिकारी लालदुहोमा हे करतात. मुख्य विरोधी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ZPM ने या निवडणुकीत ४० जागा लढवल्या आहेत. ZPM चे प्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लाल दुहोमा यांनी स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. लाल दुहोमा यांनी भ्रष्टाचार, रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आहे. सत्ताधारी एमएनएफला धक्का देत लालदुहोमा यांच्या झेडपीएम या नव्या राजकीय पक्षाने निर्णायक आघाडी घेतली आहे.
हेही वाचा :
चार राज्यांचं राहू द्या; महाराष्ट्रात परिवर्तन होणारच : शरद पवार
भाजपचा मार्ग सुकर करणारे निकाल
3 राज्यांतील विजयाने भाजपसाठी 2024 लोकसभा मैदान अनुकूल
The post मिझोरममध्ये नवख्या ‘झोरम पीपल्स’ची कमाल appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोरममध्ये चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बहुमत मिळाले आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ७ जागांसह पिछाडीवर आहे. ZPM ने २९ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. राज्यात ZPM कडे MNF चे प्रमुख आव्हान म्हणून पाहिले जात आहे. ZPM ला २०१९ मध्ये राजकीय पक्ष म्हणून मान्यता …
The post मिझोरममध्ये नवख्या ‘झोरम पीपल्स’ची कमाल appeared first on पुढारी.