International marathon : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व
पुणे : पुढारी वृत्तसेवा : 37 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर यावर्षी केनियन धावपटुंचे वर्चस्व राहिले. या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या केमेई एलियास कॅप्रोनो 2 तास 16 मिनिटे 5 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला. केनियाच्या सायमन मैना मोंगी याने 2 तास 17 मिनिटे 4 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय तर इथोपियाच्या अदेरे नेगाश हैलु याने 2 तास 19 मिनिटे 1 सेकंदाची वेळ नोंदवित तिसरे स्थान पटकावले. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टच्या वतीने आयोजित या स्पर्धेला पहाटे 3.30 वाजता सणस मैदानातुन प्रारंभ झाला तर अर्ध मॅरेथॉनला पहाटे 4 वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेत पुर्ण मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये इथोपियाच्या रोबा बटी हैलु हिने 3 तास 11 मिनिटे 4 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम क्रमांक, भारताच्या मनिषा जोशीने 3 तास 32 मिनिटे 20 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय तर भारताच्या दिस्केट दोल्मा हिने 3 तास 36 मिनिटे 12 सेकंदाची वेळ नोंदवित तिसरे स्थान पटकाविले.
संबंधित बातम्या :
अर्थज्ञान : डायरेक्ट इक्विटी की म्युच्युअल फंड?
आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांच्या दारात फिरकू नका, धुळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन
Lokasabha Election : पुण्यात लोकसभेचे उमेदवार कोण?
अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात भारताच्या उत्तम पाटील याने 1 तास 6 मिनिटे 11 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम क्रमांक, केनियाच्या निकोलस किप्लगट रुगुट याने 1 तास 7 मिनिटे 8 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय तर इथोपियाच्या वॉश तेबेजे किनेटो हिने 1 तास 7 मिनिटे 12 सेकंदाची वेळ नोंदवित तिसरे स्थान पटकाविले. महिलांच्या गटात इथोपियाच्या निग्गेटु टिसोसुआ बोसेझिनने 1 तास 17 मिनिटे 12 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम क्रमांक, भारताच्या प्राजक्ता गोडबोलेने 1 तास 17 मिनिटे 48 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय तर गुदेटा गदिसे इशेतु हिने 1 तास 18 मिनिटे 45 सेकंदाची वेळ नोंदवित तृतीय क्रमांक पटकाविला.
10 किलो मीटरच्या पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये अरुण राठोडने 30.46 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम, अंकुश हाकेने 31 मिनिटांची वेळ नोंदवित व्दितीय तर आश्विनने 31.16 सेकंदाची वेळ नोंदवित तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात श्रृष्टी रेडेकरने 37.51 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम क्रमांक, प्राची देवकरने 38.52 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय क्रमांक तर सैफान तेशिटेने 41.32 सेकंदाची वेळ नोंदवित तृतीय क्रमांक पटकाविला.
5 किलो मीटरच्या पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये ओमकार कुंभारने 17.15 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम, स्वराज पाटीलने 17.28 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय क्रमांक तर प्रथमेश देशमुखने 18.10 सेकंदाची वेळ नोंदवित तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात सोनाली देसाईने 18.22 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम, साक्षी बोर्हाडेने 19.59 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय तर अवनी आपटेने 20.34 सेकंदाची वेळ नोंदवित तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार, आंतरराष्ट्रीय जलतरणपटु रोहन मोरे, सचिन आडेकर, गुरुबन्स कौर आदि मान्यवर उपस्थित होते.
The post International marathon : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : 37 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर यावर्षी केनियन धावपटुंचे वर्चस्व राहिले. या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या केमेई एलियास कॅप्रोनो 2 तास 16 मिनिटे 5 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला. केनियाच्या सायमन मैना मोंगी याने 2 तास 17 मिनिटे 4 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय तर इथोपियाच्या अदेरे नेगाश हैलु याने 2 तास 19 …
The post International marathon : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व appeared first on पुढारी.