Crime News : पोलिसांना मदत केल्यावरून राडा
पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये खून केल्याच्या गुन्ह्यात बाहेर आल्यानंतर पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरून हॉटेलची तोडफोड करून लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने दहशत पसरविणार्या व मध्ये कोणी आले तर पोलिसात तक्रार केली, तर मी गेम करेन, अशी धमकी देणार्या दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टक्या ऊर्फ तिरुपती लष्करे (रा. पापडेवस्ती) आणि शुभम करांडे (रा. पापडेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भानुदास तुकाराम भोसले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास भेकराईनगर येथील ढमाळवाडी येथील कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल येथे घडला. आरोपींनी लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवून फिर्यादीच्या अंगावर धावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. टक्या याने हत्यार दाखवत आताच मर्डरमधून बाहेर आलो, जो कोणी माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करेल, त्याचा मी गेम करेल, अशी धमकी आरोपीने दिली.
हेही वाचा :
Pre Matric scholarship : मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ
भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव ; तीन राज्यांतील यशामुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष
The post Crime News : पोलिसांना मदत केल्यावरून राडा appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये खून केल्याच्या गुन्ह्यात बाहेर आल्यानंतर पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरून हॉटेलची तोडफोड करून लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने दहशत पसरविणार्या व मध्ये कोणी आले तर पोलिसात तक्रार केली, तर मी गेम करेन, अशी धमकी देणार्या दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टक्या ऊर्फ तिरुपती लष्करे (रा. पापडेवस्ती) आणि शुभम …
The post Crime News : पोलिसांना मदत केल्यावरून राडा appeared first on पुढारी.