“भीती मनाचा भ्रम…”: राहुल गांधींना मौनी बाबांकडून मिळाला ‘मंत्र’! व्हिडिओ व्हायरल

“भीती मनाचा भ्रम…”: राहुल गांधींना मौनी बाबांकडून मिळाला ‘मंत्र’! व्हिडिओ व्हायरल


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच उत्तराखंड दौरा केला. यावेळी त्‍यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. यावेळी त्‍यांनी मौनी बाबांचीही भेट घेतली. “घाबरु नका, भीती हा मनाचा भ्रम आहे,” असा मंत्र त्‍यांनी राहुल गांधी यांना दिला. आता केदारनाथहून परतल्यानंतर आठवडाभरानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ( Rahul Gandhi’s Kedarnath Yatra video )
मौनीबाबांनी दिले राहुल गांधींच्‍या प्रश्‍नांना लेखी उत्तर…
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्‍या व्हिडिओमध्ये राहुल रात्री केदारपुरीमध्ये मौनी बाबाच्या झोपडीत बसून त्यांना प्रश्न विचारत असल्‍याचे दिसते. या प्रश्नांची उत्तरे बाबा लेखी देत असल्‍याचे दिसते. राहुल गांधी या भेटीबाबत सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X वर लिहितात, “भीती हा मनाचा भ्रम आहे. केदारनाथमधील मौनी बाबा यांची वर्षांची तपश्चर्या याचं रहस्य जवळून जाणून घ्या. या व्हिडिओमध्ये मौनी बाबाशी झोपडीत संवाद साधण्याव्यतिरिक्त राहुल तिथे जेवण करताना दिसत आहे. ( Rahul Gandhi’s Kedarnath Yatra video )
सर्व काही केदार बाबाच्या इच्छेनुसार
व्‍हिडिओमध्‍ये दिसतं की, राहुल गांधी हे मौनी बाबांना प्रश्‍न विचारत आहेत की, तुम्ही ११ वर्षे मौन का बाळगले? मौनी बाबा लेखी उत्तर देतात की, हे फक्त केदार बाबांनाच माहीत आहे. ११ वर्षे न बोलल्यानंतर तुमच्यात कोणते बदल दिसले? या राहुल गांधींच्‍या सवालावर मौनी बाबाने लिहिले की, सर्व काही केदार बाबाच्या इच्छेनुसार आहे. तू माझ्याकडे आला नाहीस, केदारबाबा तुला इथे घेऊन आले आहेत. यावर राहुल गांधी म्‍हणतात, हो मला माहीत आहे.

“भय मन का वहम है!”
केदारनाथ में ‘मौनी’ बाबा से ‘डरो मत’ का रहस्य, और उनकी वर्षों की तपस्या को नज़दीक से जाना। pic.twitter.com/CSIhFVNFG6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 13, 2023

मौनीबाबा राहुल यांना हातवारे करत म्हणतात, काही खाशील का, राहुल हेही हातवारे करून सांगतात की, थोडे खाईन. त्यानंतर मौनीबाबांचे सहकारी झोपडीत तव्यावर रोटी भाजताना दिसतात. राहुल गांधी ही रोटी खातानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ( Rahul Gandhi’s Kedarnath Yatra video )
माणूस शांत राहिला तर अहंकार आपोआप मरतो…
या भेटीत राहुल गांधी हे प्रियांका गांधी यांचा फोटो मोनी बाबांना दाखवतात. बघा, ही माझी बहीण आहे का? यानंतर मौनी बाबा राहुल गांधी यांच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देतात. तुम्‍ही भीतीकडे कसे पाहता? या प्रश्‍नावर मौनी बाबा लिहून उत्तर देतात की, “भीती हा मनाचा भ्रम आहे.” यावेळी मौनी बाबांचे सहकारी सांगतो की, माणूस शांत राहिला तर अहंकार आपोआप मरतो. राहुल आदि शंकराचार्यांची पूजा करताना, भाविकांना भोजन वाढताना आणि दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ मंदिरातून बाहेर पडत असल्याचे फोटोही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
केदारनाथच्या कृपेने मी मनातल्या मनात नामजप करतो…
व्हिडिओच्या शेवटी, राहुल पुन्हा मौनी बाबाच्या जवळ बसले आहेत. राहुल गांधी त्‍यांना विचारतात की, तुम्‍ही अजूनही नामजप करता का? यावर मौनीबाबत लिहून उत्तर देतात, “केदारनाथच्या कृपेने मी मनातल्या मनात नामजप करतो.”यानंतर बाबा डमरू खेळू लागतात. सुमारे साडेपाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या संपूर्ण प्रवासाची छायाचित्रे शब्दांसह समोर आली आहेत.
 
The post “भीती मनाचा भ्रम…”: राहुल गांधींना मौनी बाबांकडून मिळाला ‘मंत्र’! व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच उत्तराखंड दौरा केला. यावेळी त्‍यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. यावेळी त्‍यांनी मौनी बाबांचीही भेट घेतली. “घाबरु नका, भीती हा मनाचा भ्रम आहे,” असा मंत्र त्‍यांनी राहुल गांधी यांना दिला. आता केदारनाथहून परतल्यानंतर आठवडाभरानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X वर शेअर केला …

The post “भीती मनाचा भ्रम…”: राहुल गांधींना मौनी बाबांकडून मिळाला ‘मंत्र’! व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

Go to Source