पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरली मोसंबीची बाग

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरली मोसंबीची बाग

पंढरपूर : सुरेश गायकवाड आज बलिप्रतिपदा पाडव्याच्या निमित्त श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी मोसंबीची आरास करण्यात आली आहे. याकरिता तब्‍बल 7 हजार मोसंबी फळांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मंदिरातील मोसंबीची आरास मनमोहक दिसत आहे.
दिवाळीत लक्ष्मीपूज दिनाचे औचित्य साधून श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने श्रींच्या मंदिरात, सोलखांबी येथे आज दिवाळी पाडवा निमित्त मोसंबीची मनमोहक आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीगेरंगी फुलांचा वापर करुन सजावट केली जाते. मंदिरात सजावट करण्यासाठी भाविकही उत्सुक असतात.
वाघाली ता. पैठण, जि. छत्रपती संभाजी नगर येथील भाविक आप्पासाहेब रामकृष्ण पाटील यांच्यावतीने बली प्रतिपद दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सुंदर आरास साकारण्यात आली आहे. याकरीता 7 हजार मोसंबी फळांचा वापर करण्यात आला आहे.
तर दिवाळी उत्सवात रुक्मिणी मातेला विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रुप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. श्रींच्या दर्शनाकरीता आलेल्या भाविकाना मंदिरात करण्यात आलेल्या मनमोहक आरासीचे दर्शन मिळत असल्याने भाविक मनोमनी सुखावले जात आहेत. तर मंदिर समितीच्यावतीने संकेतस्थळावरुनही घरबसल्या भाविकांना सुंदर आरासीचे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करून देण्यात आली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी संपुर्ण मंदिरात, सोळखांबी, विठ्ठल सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे मंदिरात मोसंबीचा बगीचा अवतरल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, दिवाळी सुट्टीनिमित्त भाविंकांची गर्दी वाढली. दिवाळीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरीता येणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे. यामुळे पंढरपूर येथील मंदिर परिसर, स्टेशन रोड, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
हेही वाचा :

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व जरांगे-पाटील यांच्याकडे देण्याचा ठराव 
Bride crisis | आम्ही शेतकरी पोरं, ठेवू राणी सारखी तुला! कर्नाटकातील लग्नाळूंची पदयात्रा 
Joe Biden Diwali Celebration: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्नी ‘जिल’सोबत असा साजरा केला ‘दिवाळी पाडवा’ 

The post पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरली मोसंबीची बाग appeared first on पुढारी.

पंढरपूर : सुरेश गायकवाड आज बलिप्रतिपदा पाडव्याच्या निमित्त श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी मोसंबीची आरास करण्यात आली आहे. याकरिता तब्‍बल 7 हजार मोसंबी फळांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मंदिरातील मोसंबीची आरास मनमोहक दिसत आहे. दिवाळीत लक्ष्मीपूज दिनाचे औचित्य साधून श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने श्रींच्या मंदिरात, सोलखांबी येथे आज दिवाळी पाडवा …

The post पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरली मोसंबीची बाग appeared first on पुढारी.

Go to Source