कोल्हापूर : सुळे येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून
आजरा : पुढारी वृत्तसेवा सुळे ता. आजरा येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याने सुळे व महागाव परिसरात खळबळ उडाली आहे. सुमन संभाजी पोवार (वय ४५) असे त्या महिलेचे नाव आहे. आजरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पती संभाजी ईश्वरा पोवार याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोळिंद्रे मार्गावर संभाजी ईश्वरा पोवार व सुमन संभाजी पोवार हे दाम्पत्य रहात होते. संभाजी पोवार यांची सुमन ही दुसरी पत्नी आहे. या दाम्पत्याची तीनही उच्चशिक्षित मुले पुणे येथे राहतात. सध्या सुळे येथे दोघेच पती पत्नी रहात होते. या दोघांमध्ये वारंवार किरकोळ वाद होत असत.
शनिवार दि.२ रोजी सायंकाळीही त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादात पती संभाजी यांने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात हातोडा मारला. यावेळीं पत्नी सुमन या जागीच ठार झाल्या. यानंतर संभाजी मुख्य घराच्या पाठीमागून बाजूस असलेल्या दुसऱ्या घरामध्ये झोपण्यासाठी निघून गेला. मात्र, पोलिसांच्या खाक्यामूळे खूनाचा उलगडा झाला.
हेही वाचा :
Assembly Election Results 2023 | भाजपनं छत्तीसगड, राजस्थान काँग्रेसकडून हिसकावलं, ‘एमपी’त पुन्हा ‘कमळ’, तेलंगणात BRS बाहेर
Chhattisgarh Election Result 2023 | छत्तीसगडमध्ये भाजप जिंकल तर कोण होणार मुख्यमंत्री? ही ५ नावे चर्चेत
Rajasthan Assembly Legislative Result 2023: राजस्थानात सत्ता बदलाची परंपरा कायम; BJP सत्ता स्थापनेच्या वाटेवर
The post कोल्हापूर : सुळे येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून appeared first on पुढारी.
आजरा : पुढारी वृत्तसेवा सुळे ता. आजरा येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याने सुळे व महागाव परिसरात खळबळ उडाली आहे. सुमन संभाजी पोवार (वय ४५) असे त्या महिलेचे नाव आहे. आजरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पती संभाजी ईश्वरा पोवार याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोळिंद्रे मार्गावर संभाजी ईश्वरा पोवार …
The post कोल्हापूर : सुळे येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून appeared first on पुढारी.