सलमानचा ‘टायगर ३’ दोन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल

सलमानचा ‘टायगर ३’ दोन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल


पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस चित्रपटाबद्दलची क्रेझ चाहत्यांच्या पाहायला मिळत आहे. ‘टायगर ३’ ने रिलीज होण्याआधीपासून भरघोष अशी कमाई करण्यास सुरूवात केली होती. तर सध्या चित्रपट सिनेमागृहात येवून दोनच दिवस झाले आहेत. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची टप्पा ( Tiger 3 Box Office Collection ) पार केला आहे. तर दरम्यान बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’ ला टक्कर देखील देत आहे.
संबंधित बातम्या 

राणी मी होणार : मीरा होणार मल्हारची राणी, लवकरच लगीनघाई
Tiger 3 : टायगर 3 च्या रिलीजवेळी थिएटरमध्ये फटाके, सलमान खान म्हणाला…
Tiger 3 : सल्लू मियाच्या एन्ट्रीला चित्रपटगृहातच सुतळी बॉम्‍बचा धडाका अन् एकच…(Video)

चित्रपट समिक्षक तरूण आदर्श यांनी टविट्वरून सलमानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची आकडेवारी समोर आणली आहे. या माहितीनुसार, सलमानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट दिवाळीत १२ नोव्हेंबर २०२३ रोजी थिअटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४३ कोटींची भरघोष कमाई केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५७. ५ कोटी कमावले आहेत. तर एकूण या चित्रपटाने दोन दिवसांत १०० कोटींची टप्पा ओलांडला आहे.
दि. १२ रोजी रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून या चित्रपटाचा शो हाऊसफुल्ल झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली नसल्याचे निर्मात्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ चे रेकॉर्ड मोडेल की काय? याकडेही चाहत्याचे लक्ष लागून राहिले आहे. ‘टायगर ३’ हा चित्रपट सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा आहेत. तर चित्रपटाचे बजेट ३०० कोटींहून अधिक आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. ( Tiger 3 Box Office Collection )

While *no* major #Hindi film has released on #DiwaliDay in more than a decade [film biz is severely impacted, since people are busy with festivities and #LaxmiPuja], #Tiger3 emerges a game changer… Decimates *all* #BO records for *#DiwaliDay*.
Hold on, not only is #Tiger3 the… pic.twitter.com/PIucJMhGYq
— taran adarsh (@taran_adarsh) November 13, 2023

The post सलमानचा ‘टायगर ३’ दोन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस चित्रपटाबद्दलची क्रेझ चाहत्यांच्या पाहायला मिळत आहे. ‘टायगर ३’ ने रिलीज होण्याआधीपासून भरघोष अशी कमाई करण्यास सुरूवात केली होती. तर सध्या चित्रपट सिनेमागृहात येवून दोनच दिवस झाले आहेत. आता या चित्रपटाने …

The post सलमानचा ‘टायगर ३’ दोन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल appeared first on पुढारी.

Go to Source