पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ८ जणांचा मृत्यू
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागात शनिवारी दहशतवाद्यांनी एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले आहेत. गिलगिटहून रावळपिंडीला जाणाऱ्या या बसवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिलासजवळ हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस गिलगिटहून रावळपिंडीला जात होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. बसमध्ये बहुतेक लोक कोहिस्तान, पेशावर, घिझर, चिलास, रौंदू, स्कर्दू, मानसेहरा, सिंध आणि स्वाबी भागातील होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
#Melodi सेल्फीवर पीएम मोदींची प्रतिक्रिया, फोटो रिट्विट
पाकिस्तान, बांगलादेशच्या सीमा होणार सुरक्षित : अमित शहा
इस्रायल पुन्हा राबविणार ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’!
The post पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ८ जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागात शनिवारी दहशतवाद्यांनी एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले आहेत. गिलगिटहून रावळपिंडीला जाणाऱ्या या बसवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिलासजवळ हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस गिलगिटहून रावळपिंडीला जात होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार …
The post पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ८ जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.