Rise Up : राष्ट्रीय खेळाडूच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘राईझ अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने महिलांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत झाला आहे. ही स्पर्धा प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूलच्या सिंबायोसिस स्पोर्ट्स … The post Rise Up : राष्ट्रीय खेळाडूच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत appeared first on पुढारी.
#image_title

Rise Up : राष्ट्रीय खेळाडूच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘राईझ अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने महिलांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत झाला आहे.

ही स्पर्धा प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूलच्या सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू आहे. स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे  ग्रामीण येथून महिला खेळाडू सहभागी झाल्या असून, १४९ खेळाडूंनी यात सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा अकरा वर्षांखालील, तेरा वर्षांखालील, पंधरा वर्षांखालील, सतरा वर्षांखालील, एकोणीस वर्षांखालील, खुला गट आणि अनुभवी महिला अशा सात वयोगटांत सुरू आहे.

दै. ‘पुढारी’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘राईझ अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी ‘राईझ अप’ या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सिझन २ ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती, जलतरण आणि अँंथलेटिक्स स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. ‘पुढारी’ हा एकमेव माध्यम समूह आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नसून मोफत प्रवेश आहे. या राईझ अप सिझन २ साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक
म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिटट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

हे सहभागी आहेत खेळाडू…
या स्पर्धेत धनश्री पवार, स्वप्नील नराळे, सारिका वरदे, गायत्री दांडेकर, जान्हवी फणसे, तनया अभ्यंकर, आध्या गावत्रे, स्पृहा बोरगावकर, अहना गोडबोले आणि पलक जेसवानी आदी राष्ट्रीय – आतंरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले आहेत.

दै. ‘पुढारी’कडून महिला खेळाडूंना मोठे व्यासपीठ
दै. ‘पुढारी’ च्या वतीने केवळ महिलांसाठी अशा प्रकारची स्पर्धा घेतल्याने खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंना मोफत प्रवेश दिला असून, विजेत्यांना रोख पारितोषिकेही दिली जात आहेत: दै. ‘पुढारी’ ने आगामी काळात अशा स्पर्धा वारंवार घ्याव्यात.
– मधुकर लोणारे, सेक्रेटरी, पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशन

हेही वाचा

केळीच्या पानावर जेवणे लाभदायक
दुसर्‍या महायुद्धातील बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष
‘हे’ पेंग्विन दिवसातून 10 हजारवेळा काढतात डुलक्या!

The post Rise Up : राष्ट्रीय खेळाडूच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘राईझ अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने महिलांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत झाला आहे. ही स्पर्धा प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूलच्या सिंबायोसिस स्पोर्ट्स …

The post Rise Up : राष्ट्रीय खेळाडूच्या सहभागाने उत्साह द्विगुणीत appeared first on पुढारी.

Go to Source