रहस्‍यरंजन : जमिनीखालचे अत्याधुनिक शहर

आपण कधी जमिनीखाली वसलेल्या एखाद्या शहराचं नाव ऐकलंय का? होय. असंही एक शहर आहे, जे पूर्णतः जमिनीखाली आहे… आणि हो, ते गाडले गेलेलं वगैरे नाही; तर चांगले जिते-जागते, नांदते शहर आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या भागात स्टुअर्ट राजमार्गावर अ‍ॅडलेडपासून 846 कि.मी. अंतरावर आहे. कूबर पेडी असं या शहराचं नाव आहे. या शहराला जगाची ‘माणिक राजधानी’ असंही म्हटलं … The post रहस्‍यरंजन : जमिनीखालचे अत्याधुनिक शहर appeared first on पुढारी.
#image_title

रहस्‍यरंजन : जमिनीखालचे अत्याधुनिक शहर

ऋतुपर्ण

आपण कधी जमिनीखाली वसलेल्या एखाद्या शहराचं नाव ऐकलंय का? होय. असंही एक शहर आहे, जे पूर्णतः जमिनीखाली आहे… आणि हो, ते गाडले गेलेलं वगैरे नाही; तर चांगले जिते-जागते, नांदते शहर आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या भागात स्टुअर्ट राजमार्गावर अ‍ॅडलेडपासून 846 कि.मी. अंतरावर आहे. कूबर पेडी असं या शहराचं नाव आहे. या शहराला जगाची ‘माणिक राजधानी’ असंही म्हटलं जातं.
खूप उच्च दर्जा असलेलं माणिक हे रत्न कूबर पेडीमध्ये विपुल प्रमाणावर आढळतं. सगळ्या जगात माणिक रत्नाची निर्यात याच शहरातून होते. हे संपूर्ण शहरच खणनामधून निर्माण झालेलं आहे. जमिनीच्या खाली शंभर फुटांहून जास्त खोलीवर हे शहर निर्माण झालेलं असून तिथं लोकांचं वास्तव्यदेखील आहे. शहराची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. तिथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. आलिशान हॉटेल्ससह एखाद्या शहरात जे जे काही असतं, ते ते सारं या शहरात अस्तित्वात आहे. या परिसराशी ऑस्ट्रेलियन आदिवासींचा निकटचा संबंध आहे. ते स्वतःला इथले मूलनिवासी समजतात. पाश्चिमात्य वाळवंटी देशातील रहिवासीही या भूमीशी आपलं नातं सांगतात. 1858 मध्ये मूळ स्कॉटिश असलेले संशोधक जॉन मॅकडॉल स्टुअर्ट यांना माणिक रत्नाच्या या भूमीचा शोध लागला.
1 फेब्रुवारी 1915 या दिवशी विले हचिसन यांनी खणन करून पहिल्या माणिक रत्नाचा शोध लावला. त्यानंतर वर्षभरात खणन करणार्‍यांचा लोंढाच या भूमीकडे लागून राहिला. उंची दर्जाच्या माणकांचा साठा सापडत गेला आणि जमीन पोकळ व्हायला लागली आणि त्यानंतर तिथं शहर वसण्यास आरंभ झाला. 1920 मध्य शहराचं ‘कूबर पेडी’ असं नामकरण करण्यात आलं आणि पहिल्या टपाल कार्यालयाची स्थापना झाली. 1975 मध्ये स्थानिक अदिवासींनी शहराच्या ‘उमूना’ या नव्या नावाचा स्वीकार केला. उमूना म्हणजे ‘दीर्घायुष्य!’ हा भाग तसा वाळवंटी प्रदेश मानला जातो. कारण पावसाचे पाणी अतिशय कमी, पाण्याची टंचाई, मातीची टंचाई अशा कारणांमुळे इथं झाडी तशी कमीच आहे.
कडक उन्हाळ्यात असंख्य रहिवासी कूबर पेडी शहरातील गुहांमध्ये वास्तव्य करतात. गुहा म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते तशी गुहा नाही; तर त्यांची सजावट पाहता त्यांना आलिशान असंच म्हटलं जातं. अशा गुहेतील तापमान स्थिर राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान 40 डिग्री सेल्सियस असतं आणि हवेतील आर्द्रता 20 टक्के असते. थंडीच्या दिवसात मात्र शहरात बराच गारवा असतो. शहराची प्रशासकीय यंत्रणा जिल्हा परिषद सांभाळते. यांत्रिकीकरणाद्वारे इथली पुष्कळशी कामे केली जातात. पाण्याच्या कमतरतेमुळे एकूणच दक्षिण ऑस्ट्रेलियात पाण्याचा दर जास्त आहे, तसा तो कूबर पेडीतही आहे. पण इथले राहिवासी आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. कारण ते माणिक रत्नाचे खडे शोधून काढून जगभर निर्यात करून पैसा कमावणारे लोक आहेत.
या परिसरात माणिक रत्नाचे एकूण सत्तर प्रदेश आहेत. 1999 पर्यंत या परिसरात बेसुमार खनन झालं. त्यामुळं सरकारनं त्यावर काही निर्बंध लादले. त्यामुळं खननाचं प्रमाण कमी झालं. कूबर पेडीच्या जवळ जोरबा विस्तारित भागाच्या माणिक क्षेत्रात ‘उमूनासॉरस’च्या एका माणिकव्याप्त जीवाश्माच्या सांगाड्याचा शोध लागला. सध्या तो ऑस्ट्रेलियातील एक संग्रहालयात आहे.
सन 2009 च्या मे महिन्यात ऑस्ट्रेलियातील माइक रॅन यांनी कूबर पेडीपासून 130 कि.मी. आग्नेयेला 1.15 अब्ज डॉलर किमतीची एक महत्त्वाची खाण शोधली. त्या ओजेड मिनरल्सद्वारा तांबे आणि सोने काढले जाते. ऑगस्ट 2010 मध्ये रॅन यांनी कूबर पेडीच्या जवळच केयर्न डोंगर रांगांमध्ये लोखंड, सोने, तांबे यांचे फार मोठे प्रमाण असलेल्या खनिजद्रव्याचा शोध लावला. त्या भागात खनन केलं. एकोणिसाव्या शतकानंतर ऑस्ट्रेलियात शोधण्यात आलेली मौल्यवान धातूंची ही पहिली खाण होय. लोहखनिजाला किंमत कमी यायला लागल्यानंतर ही खाण जून 2014 मध्ये बंद करण्यात आली. नंतर ती क्यू-रिवर माइनिंगला विकण्यात आली. या कंपनीने 2016 मध्ये ही खाण पुन्हा सुरू केली.
कूबर पेडीच्या परिसरात 2013 मध्ये अरकारिंगा बेसनमध्ये तेलाची खाण शोधण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला शुद्ध तेल निर्यातदार होण्याची संधी मिळाली. आता हा सारा परिसर हे एक पर्यटन केंद्र बनलेले आहे. विशेषतः 1987 मध्ये स्टुअर्ट राजमार्ग पूर्ण झाला, तेव्हापासून इथे पर्यटकांची रीघ लागलेली आहे. कूबर पेडी शहरात मोठ्या जनसमुदायाला माणिक रत्नाच्या खनन कार्याबरोबरच पर्यटन केंद्र म्हणूनही मोठे आर्थिक स्थैर्य लाभले आहे. इथल्या माणिक रत्नांच्या खाणीबरोबरच शहरातील अनेक स्थळे, चर्चेस आणि दफनभूमीसुद्धा पाहायला लोक येतात. इथे एक भाग पूर्ण मोटेल आहे. हायब्रिड सौर ऊर्जा केंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. माणिक रत्न खाणीतील काही मौल्यवान रत्नांचे संग्रहालयसुद्धा येथे आहे. वार्षिक कूबर पेडी माणिक महोत्सव दरवर्षी जून महिन्यात येथे भरतो.
तीन खोल्यांची विशाल गुहा, तसेच कॅथॉलिक चर्च आणि काही ज्येष्ठांचे, मंत्र्यांचे देह जतन करून ठेवलेली शवागृहे ही इथली वारसास्थळे आहेत. कूबर पेडीमध्ये अत्याधुनिक आरोग्य केंद्र, पाक्षिक स्वरूपात नियतकालिके प्रकाशित होतात. कूबर पेडीमध्ये स्थानिक आणि राष्ट्रीय रेडिओ आणि पाच प्रकारच्या दूरदर्शन सेवाही उपलब्ध आहेत. शहरात गोल्फ कोर्स विकसित केलेले आहे. या गोल्फ कोर्सवर हिरवळ नाही. उष्मा बराच असल्याने हा खेळ रात्री खेळला जातो. शहरात एक फुटबॉल क्लब आहे अन् तिथे अनेक सामने खेळले जातात. उमूना कला केंद्रासाठी 2021 मध्ये एक मंडळ स्थापन करण्यात आले. प्रतिभावंत कलाकार आपली कला इथं सादर करतात. स्थानिक कलाकारांना हे अर्थप्राप्तीचं हे साधन उपलब्ध आहे. इथं टपाल कार्यालयासह टपाल तिकीट संग्रहालय आहे. आता हे शहर चित्रपट निर्मात्यांनाही आकृष्ट करून घेत आहे.
The post रहस्‍यरंजन : जमिनीखालचे अत्याधुनिक शहर appeared first on पुढारी.

आपण कधी जमिनीखाली वसलेल्या एखाद्या शहराचं नाव ऐकलंय का? होय. असंही एक शहर आहे, जे पूर्णतः जमिनीखाली आहे… आणि हो, ते गाडले गेलेलं वगैरे नाही; तर चांगले जिते-जागते, नांदते शहर आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या भागात स्टुअर्ट राजमार्गावर अ‍ॅडलेडपासून 846 कि.मी. अंतरावर आहे. कूबर पेडी असं या शहराचं नाव आहे. या शहराला जगाची ‘माणिक राजधानी’ असंही म्हटलं …

The post रहस्‍यरंजन : जमिनीखालचे अत्याधुनिक शहर appeared first on पुढारी.

Go to Source