छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’?

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी आज रविवारी (दि.३) मतमोजणी सकाळी ८ वाजतापासुन सुरु आहे. सुरुवातीच्या कलापासुन कॉंग्रेस आघाडीवर होता. त्यानंतर दोन्ही पक्षात काटे की टक्कर सुरु झाली. आताचा कल पाहता भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेस ४२ जागांवर आघाडीवर आहे.  छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल संस्थांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. येथे गेली पाच … The post छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’? appeared first on पुढारी.
#image_title
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’?


पुढारी ऑनलाईन : छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी आज रविवारी (दि.३) मतमोजणी सकाळी ८ वाजतापासुन सुरु आहे. सुरुवातीच्या कलापासुन कॉंग्रेस आघाडीवर होता. त्यानंतर दोन्ही पक्षात काटे की टक्कर सुरु झाली. आताचा कल पाहता भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेस ४२ जागांवर आघाडीवर आहे.  छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल संस्थांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. येथे गेली पाच वर्षे भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. (Chhattisgarh Election Result Live)
काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात छत्तीसगडमध्ये राजीव गांधी किसान न्याय योजनेप्रमाणे सध्याच्या कल्याणकारी योजना सुरू ठेवण्याचे वचन दिले होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यभर रॅली आणि जाहीर सभांना संबोधित केले, जिथे त्यांनी त्यांच्या सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला होता. दरम्यान, भाजपने ‘मोदीज गारंटी फॉर छत्तीसगड २०२३’ असा जाहीरनामा घेऊन निवडणुकीचा प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचारादरम्यान एक लाख नवीन रोजगार, शेतकऱ्यांना मोफत वीज, उत्तम पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.
जनता जनार्दनला सलाम : भूपेश बघेल
छत्तीसगडमध्ये  गेली पाच वर्षे भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी आज  (दि.३) मतमोजणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ” आज मतमोजणीचा दिवस आहे. जनता जनार्दनला सलाम. सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा.”
Chhattisgarh Election Result Live |
 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, रामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार फूलसिंग राठिया, खरसियाचे उमेश पटेल, बिंद्रनवागढचे जनक ध्रुव, बेमेटाराचे आशिष छाबरा आणि मनेंद्रगडचे आदित्य राज हे सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत.
पुन्हा एकदा कॉंग्रेसने आघाडीवर आहे. कॉंग्रेस ४९ तर भाजप ४० जागांवर आघाडीवर आहे.
आताचा कल पाहता भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेस ४२ जागांवर आघाडीवर आहे.
नुकत्याच आलेल्या कलानुसार कॉंग्रेस आणि भाजप ४४ जागांवर आघाडीवर आहे. काटे की टक्कर सुरु आहे.
सुरुवातीच्या कलानुसार नारायणपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासुन अद्याप  काँग्रेस आघाडीवर आहे.  38 जागांवर कॉंग्रेस आघाडीवर  तर भाजप 29 जागांवर आघाडीवर आहे.
सुरुवातीच्या कलानुसार  पाटणमधून भाजप नेते विजय बघेल आघाडीवर आहेत. तर राजनांदगाव मतदारसंघातून भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह आघाडीवर आहेत.
अद्याप कॉंग्रेस आघाडीवर आहे. कॉंग्रेस ३८, भाजप ३२ तर अपक्ष १ जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमध्ये नुकत्याच आलेल्या कलानुसार भाजप २४ कॉंग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडमध्ये प्रत्येक मतगणना केंद्राने त्रिस्तरिय व्यवस्था केली आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभा जागांसाठी ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर  दोन टप्प्यात मतदान झाले होते. आज मतमोजणी होत आहे. त्यात राज्यातील 76.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2003 ते 2018 अशी सलग 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी राज्यातील जनता संधी देईल, अशी आशा आहे. दुसरीकडे, काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने केलेले काम जनतेला आवडले असून राज्यात पुन्हा एकदा त्यांचेच सरकार स्थापन होणार आहे, अशी काँग्रेसला आशा आहे.

आज जनादेश का दिन है.
जनता जनार्दन को प्रणाम.
सभी प्रत्याशियों को शुभकामनाएँ.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) December 3, 2023

Counting of votes for Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan and Telangana Assembly elections begins. pic.twitter.com/Raj87zBuaI
— ANI (@ANI) December 3, 2023

हेही वाचा 

Assembly Election 2023 : आज निवडणुकांचा निकाल, आश्वासनांचा कस लागणार !
Rajasthan Election Results Live | राजस्थानात परिवर्तन की सत्ता जैसे थे राहणार
Assembly Election 2023 : आज निवडणुकांचा निकाल, आश्वासनांचा कस लागणार !
Nagpur University111th Convocation : नव्या शैक्षणिक धोरणाने देश वैश्विक ज्ञानशक्ती; राष्ट्रपतींचे प्रतिपादन

The post छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी आज रविवारी (दि.३) मतमोजणी सकाळी ८ वाजतापासुन सुरु आहे. सुरुवातीच्या कलापासुन कॉंग्रेस आघाडीवर होता. त्यानंतर दोन्ही पक्षात काटे की टक्कर सुरु झाली. आताचा कल पाहता भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेस ४२ जागांवर आघाडीवर आहे.  छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल संस्थांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. येथे गेली पाच …

The post छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’? appeared first on पुढारी.

Go to Source