भय, भ्रम आणि चारित्र्यहनन करणे ही भाजपाची वृत्ती : सुषमा अंधारे
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सासू, नवर्याचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहूनही सोनिया गांधी यांनी दाखवलेला कणखरपणा आणि सेवा, कर्तव्य व त्यागाची भावना देशवासीयांसाठी आशादायी आहे. भाजपचे ‘डॅमेज’ अणि ‘रूल’ हे सूत्र असून, भय, भ—म आणि चारित्र्यहनन ही वृत्ती आहे. या अस्त्राचा उपयोग करून विरोधकांना संपवण्याचे डाव भाजप करते, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 19 व्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, दत्ता बहिरट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी अध्यक्षस्थानी होते.
अंधारे म्हणाले, सध्याचे सत्ताधारी कर्तव्य आणि त्याग विसरून गेले आहेत. देशात संधीसाधूपणा वाढलेला असून, प्रत्येक जण लुबाडण्याचे काम करतोय. भवताल भ—मीत करून, चारित्र्य हत्या केल्या जात आहेत. भाजपचे नेते विकृत वृत्तीचे दर्शन घडवत आहेत. त्यांच्या चेहर्यावरील बुरखा फाडून खरा चेहरा उघडा पाडण्याची वेळ आली आहे. महिलांचा आदर करत नाहीत. गाईबद्दल संवेदना दाखवणारे हिंदूवादी लोक बाईबद्दल मात्र संवेदनशील नाहीत, हे दुर्दैवी आहे. पाच राज्यांचा निकाल भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा
तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे
जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी
कोल्हापुरात आज राज्य वकील परिषद
The post भय, भ्रम आणि चारित्र्यहनन करणे ही भाजपाची वृत्ती : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सासू, नवर्याचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहूनही सोनिया गांधी यांनी दाखवलेला कणखरपणा आणि सेवा, कर्तव्य व त्यागाची भावना देशवासीयांसाठी आशादायी आहे. भाजपचे ‘डॅमेज’ अणि ‘रूल’ हे सूत्र असून, भय, भ—म आणि चारित्र्यहनन ही वृत्ती आहे. या अस्त्राचा उपयोग करून विरोधकांना संपवण्याचे डाव भाजप करते, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी …
The post भय, भ्रम आणि चारित्र्यहनन करणे ही भाजपाची वृत्ती : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.