MP Live | इंदौरमधून भाजपचे कैलास विजयवर्गीय आघाडीवर
पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी आज रविवारी (दि.२) मतमोजणी होत आहे. राज्यात १७ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. राज्यात ७७.८२ टक्के विक्रमी मतदान झाले होते, जे २०१८ च्या निवडणुकीपेक्षा २.१९ टक्के अधिक आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. (MP Election Result 2023 Live)
Live Update
मध्यप्रदेशातील इंदौरमधून भाजपचे कैलास विजयवर्गीय आघाडीवर
मध्य प्रदेशातील सर्व २३० विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजता कडेकोट बंदोबस्तात ५२ जिल्हा मुख्यालयात मतमोजणी सुरू झाली. मध्य प्रदेशात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी ११६ चा जादुई आकडा आवश्यक असेल. येथे चारवेळा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री राहिले आहेत. आता पाचव्यांदा ते सत्ता राखणार का? याकडे लक्ष लागले आहे. तर काँग्रेस नेते कमलनाथ यांनी, मध्य प्रदेशच्या जनतेवर पूर्ण विश्वास असून एक्झिट पोल काय सांगतोय याच्याशी मला देणेघेणे नाही, असे म्हटले आहे. (MP Election Result 2023 Live)
The post MP Live | इंदौरमधून भाजपचे कैलास विजयवर्गीय आघाडीवर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी आज रविवारी (दि.२) मतमोजणी होत आहे. राज्यात १७ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. राज्यात ७७.८२ टक्के विक्रमी मतदान झाले होते, जे २०१८ च्या निवडणुकीपेक्षा २.१९ टक्के अधिक आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. …
The post MP Live | इंदौरमधून भाजपचे कैलास विजयवर्गीय आघाडीवर appeared first on पुढारी.