अलुवा बालिका अत्‍याचार-हत्या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा

अलुवा बालिका अत्‍याचार-हत्या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केरळमधील बहुचर्चित अलुवा बालिका अत्‍याचार आणि हत्‍या प्रकरणातील आरोपी असफाक आलम याला एर्नाकुलम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज (दि.१४) फाशीची शिक्षा सुनावली. तसेच ‘पोक्सो’ कायद्याच्या आणि आयपीसीच्या पाच कलमांतर्गत पाच वेळा जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. ७.२० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ( Aluva child rape and murder case)
असफाक आलम याने २८ जुलै २०२३ रोजी दुपारी घराजवळ रहणार्‍या पाच वर्षाच्या बालिकेचे अपहरण केले होते. यानंतर तिच्‍यावर अत्‍याचार करुन तिची हत्या केली होती. एर्नाकुलम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या खटल्‍याची जलद सुनावणी घेत गुन्‍ह्याच्‍या १०० व्‍या दिवशी म्‍हणजे ४ नोव्‍हेंबर २०२३ रोजी न्‍यायाधीश के सोमण यांनी आरोपी असफाक आलम याला दोषी ठरवले. ( Aluva child rape and murder case)
फिर्यादीच्‍या वकिलांनी हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे, असे स्‍पष्‍ट करत दोषीला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्‍याची मागणी केली होती. अखेर आज न्‍यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिनानिमित्त न्यायालयाने बालिकेवरील अत्‍याचार प्रकरणातील नराधम आलमला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा :

सुनेला लैंगिक अत्‍याचारापासून वाचविण्‍यासाठी सासूने उचलले टोकाचे पाऊल, थेट पतीचा…
१४ दिवस पाेलीस काय करत हाेते? मणिपूर अत्‍याचार प्रकरणी सरन्‍यायाधीशांचा सवाल

 
The post अलुवा बालिका अत्‍याचार-हत्या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केरळमधील बहुचर्चित अलुवा बालिका अत्‍याचार आणि हत्‍या प्रकरणातील आरोपी असफाक आलम याला एर्नाकुलम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज (दि.१४) फाशीची शिक्षा सुनावली. तसेच ‘पोक्सो’ कायद्याच्या आणि आयपीसीच्या पाच कलमांतर्गत पाच वेळा जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. ७.२० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ( Aluva child rape and murder case) असफाक …

The post अलुवा बालिका अत्‍याचार-हत्या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा appeared first on पुढारी.

Go to Source