राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, दगड आणि ऑइलची बाटली घटनास्थळी

जालना; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्या कारवर आज (दि. २) हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात लोकांकडून जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभ्या असलेल्या टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात जिल्हा … The post राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, दगड आणि ऑइलची बाटली घटनास्थळी appeared first on पुढारी.
#image_title

राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, दगड आणि ऑइलची बाटली घटनास्थळी

जालना; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्या कारवर आज (दि. २) हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात लोकांकडून जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभ्या असलेल्या टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत, त्यानिमित्ताने राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दाखल झाले. यावेळी टोपे यांच्या गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली आहे.
अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला
राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला कोणी केला हे समजू शकलं नाही, त्यामुळे यातील आरोपीचं अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत त्यांच्या गाडीच्या समोरची काच फुटली आहे. गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील सापडलेली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेली असून मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी जालना जिल्हा सध्या चर्चेत आहे.
राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. जालन्यात सध्या जिल्हा बँक निवडणूक, आरक्षण आंदोलनामुळे वातावरण संवेदनशील झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड नेमकी कुणी केली आणि का? केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राजेश टोपे यांच्याकडून देखील यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही, अशी माहिती आहे.
The post राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, दगड आणि ऑइलची बाटली घटनास्थळी appeared first on पुढारी.

जालना; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्या कारवर आज (दि. २) हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात लोकांकडून जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभ्या असलेल्या टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात जिल्हा …

The post राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, दगड आणि ऑइलची बाटली घटनास्थळी appeared first on पुढारी.

Go to Source