‘एकाधिकारशाहीला कंटाळलो’ म्हणत शिवसैनिकांचे परळीतून राजीनामे

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आर्थिक देवाणघेवाण करत असल्याचा गंभीर आरोप देखील परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. (Maharashtra Politics) शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज अंधारे … The post ‘एकाधिकारशाहीला कंटाळलो’ म्हणत शिवसैनिकांचे परळीतून राजीनामे appeared first on पुढारी.
#image_title
‘एकाधिकारशाहीला कंटाळलो’ म्हणत शिवसैनिकांचे परळीतून राजीनामे


बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आर्थिक देवाणघेवाण करत असल्याचा गंभीर आरोप देखील परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज अंधारे यांच्या परळीतील होमपीच वरून तालुका प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत आपले राजीनामे दिले आहेत. परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप शिवसेनिकांनी केला. एकाधिकारशाहीला कंटाळलो असल्याचे म्हणत पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींना पाठवले आहेत. दरम्यान या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा 

#Melodi सेल्फीवर पीएम मोदींनी दिली प्रतिक्रिया, इटलीच्या पीएम मेलोनींसोबतचा फोटो केला रिट्विट
Winter Forecast | यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा थंडी कमीच; IMD चा अंदाज

 
The post ‘एकाधिकारशाहीला कंटाळलो’ म्हणत शिवसैनिकांचे परळीतून राजीनामे appeared first on पुढारी.

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आर्थिक देवाणघेवाण करत असल्याचा गंभीर आरोप देखील परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. (Maharashtra Politics) शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज अंधारे …

The post ‘एकाधिकारशाहीला कंटाळलो’ म्हणत शिवसैनिकांचे परळीतून राजीनामे appeared first on पुढारी.

Go to Source