Crime news : ज्येष्ठाची बॅग व मोबाईल चोरणारा जेरबंद

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : एसटी बसस्थानकातून ज्येष्ठ नागरिकाची बॅग व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) दुपारी अडिच ते तीन वाजेच्या दरम्यान हा घटना घडली होती. या प्रकरणी भीमा भाऊ उनवणे (रा. निमगावसावा, … The post Crime news : ज्येष्ठाची बॅग व मोबाईल चोरणारा जेरबंद appeared first on पुढारी.
#image_title

Crime news : ज्येष्ठाची बॅग व मोबाईल चोरणारा जेरबंद

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : एसटी बसस्थानकातून ज्येष्ठ नागरिकाची बॅग व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) दुपारी अडिच ते तीन वाजेच्या दरम्यान हा घटना घडली होती. या प्रकरणी भीमा भाऊ उनवणे (रा. निमगावसावा, ता. जुन्नर ) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मनोज देवराम शिर्के (रा. डोंगरी चाळ अंधेरी, मुंबई) असे अटक चोरट्याचे नाव आहे.
नारायणगाव बसस्थानकामध्ये फिर्यादी उनवणे यांची बॅग आणि मोबाईल चोरी झाला होता. उनवणे यांनी फिर्याद दिल्यानंतर नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर मनोज शिर्के याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेली बॅग व मोबाईल हस्तगत केला. पोलिस उपनिरीक्षक जगदीश पाटील, हवालदार काळुराम साबळे, पोलिस जवान सचिन सातपुते, होमगार्ड अक्षय ढोबळे, सुरज कुऱ्हाडे यांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा :

नाशिक : भाजी घ्यायला बाहेर पडले, इकडे घर आगीत भस्मसात; तोरणा नगरची घटना
अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत

The post Crime news : ज्येष्ठाची बॅग व मोबाईल चोरणारा जेरबंद appeared first on पुढारी.

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : एसटी बसस्थानकातून ज्येष्ठ नागरिकाची बॅग व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) दुपारी अडिच ते तीन वाजेच्या दरम्यान हा घटना घडली होती. या प्रकरणी भीमा भाऊ उनवणे (रा. निमगावसावा, …

The post Crime news : ज्येष्ठाची बॅग व मोबाईल चोरणारा जेरबंद appeared first on पुढारी.

Go to Source