यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा थंडी कमीच; IMD चा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत भारतातील हिवाळा नेहमीपेक्षा अधिक उष्ण असण्याचा अंदाज आहे. दरम्यान या ऋतूत शीतलहरींची तीव्रता आणि वारंवारता कमी असणार आहे, असे हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिंदुस्थान टाईम्स’ने दिले आहे. ( Winter Forecast) डिसेंबर महिना सुरू झाला असून, अनेकजण थंडीच्या … The post यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा थंडी कमीच; IMD चा अंदाज appeared first on पुढारी.
#image_title

यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा थंडी कमीच; IMD चा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत भारतातील हिवाळा नेहमीपेक्षा अधिक उष्ण असण्याचा अंदाज आहे. दरम्यान या ऋतूत शीतलहरींची तीव्रता आणि वारंवारता कमी असणार आहे, असे हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिंदुस्थान टाईम्स’ने दिले आहे. ( Winter Forecast)
डिसेंबर महिना सुरू झाला असून, अनेकजण थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र डिसेंबर महिन्यात जर कडाक्याच्या थंडीची तुम्ही देखील वाट पाहात असाल तर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या वर्षी डिसेंबर महिन्यात तुम्हाला फारशी थंडी जाणवणार नाही, असे हवामान खात्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधित असलेला हिवाळा संपूर्ण देशासाठी नेहमीपेक्षा जास्त उष्ण असेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. (Winter Forecast)

मौसम के दौरान, देश के कई हिस्सों में सामान्य से ऊपर के अधिकतम तापमान होने की संभावना है, कुछ क्षेत्रों को छोड़कर केंद्रीय और पड़ोसी उत्तर-पश्चिम भारत के कुछ क्षेत्रों में सामान्य से कम या न्यूनतम अधिकतम तापमान होने की संभावना है pic.twitter.com/oFvfPpAVik
— India Meteorological Department (@Indiametdept) December 1, 2023

Winter Forecast : उत्तर, वायव्येत थंडीच्या लाटेची तीव्रता आणि वारंवारता कमी
आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे की, देशातील उत्तर, वायव्य, मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य भारतातील बहुतांश भागांत थंडीच्या लाटेची तीव्रता आणि वारंवारता कमी असणार आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर मध्य आणि वायव्य भारतातील बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असे देखील त्यांनी परिषदेत स्पष्ट केले आहे.
यंदाचा हिवाळा नेहमीपेक्षा अधिक उष्ण
नोव्हेंबरच्या अंदाजानुसार, आगामी डिसेंबर महिना आणि एकूण हिवाळा हंगामात हवामान नेहमीपेक्षा जास्त उष्ण असण्याची अपेक्षा आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये डिसेंबरचे मासिक कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असेही आएमडीचे संचालक यांनी म्हटले आहे.
डिसेंबरमध्ये तापमान किती असेल?
शुक्रवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत हवामान खात्याने सांगितले की, डिसेंबरमध्ये देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आगामी हिवाळी हंगामात (डिसेंबर ते फेब्रुवारी 2024) देशाच्या उत्तर, उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात थंडीची लाट सामान्यपेक्षा कमी असेल, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

दिसंबर 2023 के लिए न्यूनतम तापमान का संभावना पूर्वानुमान#WinterSession #temperatures@moesgoi@DDNewslive@ndmaindia@airnewsalerts pic.twitter.com/d3ESQAJBFm
— India Meteorological Department (@Indiametdept) December 1, 2023

हेही वाचा:

Weather Update :
Cold Wave update : देशात नोव्हेंबरमध्ये थंडी कमीच; भारतीय हवामान विभागाची माहिती

The post यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा थंडी कमीच; IMD चा अंदाज appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत भारतातील हिवाळा नेहमीपेक्षा अधिक उष्ण असण्याचा अंदाज आहे. दरम्यान या ऋतूत शीतलहरींची तीव्रता आणि वारंवारता कमी असणार आहे, असे हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिंदुस्थान टाईम्स’ने दिले आहे. ( Winter Forecast) डिसेंबर महिना सुरू झाला असून, अनेकजण थंडीच्या …

The post यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा थंडी कमीच; IMD चा अंदाज appeared first on पुढारी.

Go to Source