Nagar : संतप्त शेतकर्‍यांचे दुग्धाभिषेक आंदोलन

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : दुधाला दरवाढ मिळावी, या प्रमुख मागणीसह संपूर्ण पाथर्डी तालुका गंभीर दुष्काळी म्हणून जाहीर करावा, यासाठी दूध उत्पादक व शेतकर्‍यांनी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्याच्या प्रतिमांसमोर दूध ओतून दुग्धाभिषेक आंदोलन केले. आदिनाथ देवढे याने या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनापूर्वी दूधउत्पादकांनी शहरांतून दुचाकीवर दूधाचे कॅन घेऊन मोर्चा … The post Nagar : संतप्त शेतकर्‍यांचे दुग्धाभिषेक आंदोलन appeared first on पुढारी.
#image_title

Nagar : संतप्त शेतकर्‍यांचे दुग्धाभिषेक आंदोलन

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : दुधाला दरवाढ मिळावी, या प्रमुख मागणीसह संपूर्ण पाथर्डी तालुका गंभीर दुष्काळी म्हणून जाहीर करावा, यासाठी दूध उत्पादक व शेतकर्‍यांनी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्याच्या प्रतिमांसमोर दूध ओतून दुग्धाभिषेक आंदोलन केले. आदिनाथ देवढे याने या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनापूर्वी दूधउत्पादकांनी शहरांतून दुचाकीवर दूधाचे कॅन घेऊन मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. नाईक चौकात अडीच तास आंदोलन केले.
आदिनाथ देवढे, प्रा. सुनील पाखरे, दत्ता पाठक, अक्षय वायकर, विशाल भोईटे, संदीप देवढे, नागेश रोडे, ज्ञानेश्वर खवले, सतीश शिरसाट, प्रदीप चन्ने, ज्ञानेश्वर काकडे, शहादेव भाबड, मंगेश मदगुल, दत्ता बडे, दत्तू चितळे, दत्तू दातीर, महादेव मरकड, ज्ञानेश्वर शेळके, पप्पू केदार, मल्हारी आठरे, गणेश गिर्‍हे, आजीनाथ पुंड, नारायण कोलते, तुकाराम देवढे, गणेश गाडेकर, भीम गर्जे, प्रवीण केदार आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :

Pune : वेल्ह्यात कुणबी दाखल्यांसाठी झुंबड
नागपूर ; ट्रिपल इंजिन सरकारचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील : विजय वडेट्टीवार
नाशिक : भाजी घ्यायला बाहेर पडले, इकडे घर आगीत भस्मसात; तोरणा नगरची घटना

दुधाला शासकीय हमीभाव मिळावा. शासनाने अध्यादेश काढूनही हमीभाव नाकारणार्‍या सहकारी संघावर गुन्हे नोंदवा,जनावरांना चारा डेपो व औषधालय उपलब्ध करा, संपूर्ण पाथर्डी तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा, पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात आणा आदी प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या.
आदिनाथ देवढे म्हणाले, पाथर्डी तालुक्यात गंभीर दुष्काळ असूनही अनेक मंडळं दुष्काळापासून वंचित ठेवली आहेत. सध्या शेतकर्‍यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. दुष्काळाने खचलेला शेतकरी अवकाळी पावसाने हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत पशुधन वाचवणे जिकिरीचे झाले आहे. राज्य सरकारने यापूर्वी दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर जाहीर करूनही राज्यातील सहकारी संघ आणि खासगी प्रकल्पांनी संगनमताने दूधाचे दर पाडले आहेत. दुसरीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. काल अन्नभेसळ प्रतिबंधक यंत्रणा आपल्या हातात आहेत. मिल्को मीटर, वजन तपासणी पथके सरकारकडे आहेत. मग सरकारातील मंत्री याचा वापर का करत नाहीत? गत पाच वर्षांत आपण दूध भेसळ करणार्‍यांवर किती कारवाया केल्या, असा सवाल करण्यात आला.
आवश्यक पर्जन्यमापन यंत्रणा पुनर्रचना झालेल्या नवीन मंडलांना नसल्याने अकोला मंडलाचा समावेश हा दूष्काळी यादीतच राहील, असे आश्वासन तहसीलदार शाम वाडकर यांनी दिले. बबन खेडकर, तुळशीराम सानप, शाकीर शेख, वसंत खेडकर, तुकाराम देवढे, प्रेमचंद खंडागळे, एकनाथ वाकचौरे, अंबादास ठोंबरे, तुळशीराम सानप, भाऊसाहेब देवढे, अशोक डोईफोडे, विश्वजित कटके, शेखर देवढे, गहिनीनाथ गर्जे आदी शेतकर्‍यांसह अनेक दूधउत्पादक उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, गुप्तवार्ताचे भगवान सानप यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दुष्काळी यादीतून वगळणे दुदैवी : देवढे
कायमच दुष्काळी पाथर्डी तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले. त्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन द्यावे लागते, हे दुर्दैव आहे. शेतकर्‍यांसह असंख्य लोकांचे प्रश्न आहेत. मात्र,ते प्रश्न न सोडविता खासदार सुजय विखे यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका आदिनाथ देवढे यांनी केली.
The post Nagar : संतप्त शेतकर्‍यांचे दुग्धाभिषेक आंदोलन appeared first on पुढारी.

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : दुधाला दरवाढ मिळावी, या प्रमुख मागणीसह संपूर्ण पाथर्डी तालुका गंभीर दुष्काळी म्हणून जाहीर करावा, यासाठी दूध उत्पादक व शेतकर्‍यांनी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्याच्या प्रतिमांसमोर दूध ओतून दुग्धाभिषेक आंदोलन केले. आदिनाथ देवढे याने या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनापूर्वी दूधउत्पादकांनी शहरांतून दुचाकीवर दूधाचे कॅन घेऊन मोर्चा …

The post Nagar : संतप्त शेतकर्‍यांचे दुग्धाभिषेक आंदोलन appeared first on पुढारी.

Go to Source