ट्रिपल इंजिन सरकारचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील – विजय वडेट्टीवार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा राज्यात सध्या ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. पण पुढील काळात या ट्रिपल इंजिनचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील. सत्तेसाठी काहीही करण्याची यांची वृत्ती आहे, सारे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भविष्यातील विदूषक म्हणून ही मंडळी ठरतील अशी परिस्थिती आहे. आता विदूषकांचे … The post ट्रिपल इंजिन सरकारचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील – विजय वडेट्टीवार appeared first on पुढारी.
#image_title

ट्रिपल इंजिन सरकारचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील – विजय वडेट्टीवार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा राज्यात सध्या ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. पण पुढील काळात या ट्रिपल इंजिनचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील. सत्तेसाठी काहीही करण्याची यांची वृत्ती आहे, सारे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील भविष्यातील विदूषक म्हणून ही मंडळी ठरतील अशी परिस्थिती आहे. आता विदूषकांचे चाळे कशा पद्धतीचे असतात हे मला सांगायची गरज नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
बारामतीची जागा महायुतीकडून सुनेत्रा पवार लढवतील, अशी चर्चा आहे. हा त्यांचा प्रश्न आहे. कोणी दावा काय करायचा तो महायुती अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या अंतर्गत लाथाळ्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. जातनिहाय जनगणना महत्वाची आहे. मी सुद्धा ती भूमिका मांडलेली आहे. सर्वेक्षण करायचे आहे तर सर्व समाजाचं करा. कारण ओबीसीच्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट मिळवत असताना वर्ष-वर्ष थांबून राहावं लागतं आणि त्यांना अनेकांना नोकरीपासून मुकावं लागत. यामध्ये खूप मोठ नुकसान ओबीसी समाजाचे होते.
सर्वेक्षण करायचं आहे तर जातनिहाय जनगणना सर्वांची करा आणि सर्व एक साथ केली पाहिजे. आमचे नेते राहुल गांधी म्हणतात, त्या पद्धतीने झालं तरच यावरचा फायनल तोडगा निघू शकेल. नाहीतर पुन्हा राज्यांमध्ये समाजात आपसात भांडण होत राहतील. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होत आहे. अधिवेशनाचा जो कालावधी दहा दिवसाचा आहे. या दहा दिवसांच्या अपुऱ्या कालावधीमध्ये कुठल्या प्रश्नाला आपण प्राधान्याने घेतले पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि त्याबरोबरचं काय चर्चा होईल आणि विशेष करून अशासकीय कामकाज जे आहे, आमच्या हक्काचा जो प्रस्ताव असतो. त्यावर चर्चा कधीही होत नाही. त्याला पुरेसा वेळ कसा आपल्याला उपलब्ध करून देता येईल, कारण राज्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चर्चा होऊन लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा अपेक्षित आहे. त्या दृष्टीने आपण ही संपूर्ण रणनीती बैठकीमध्ये चर्चा करून ठरवणार आहोत. आज राज्यात राजकीय प्रदूषण वाढवणारेचं तसे म्हणतात, ज्यांनी स्वतःच्या कारखान्यातून धूर सोडायचा आणि आपणच म्हणायचं की पोल्युशन वाढत आहे. त्याची सुरूवात कोणी केली? राजकीय पोल्युशन कुणी वाढवलं? याला जबाबदार असेल तर भारतीय जनता पक्ष.
राजस्थानमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, मध्यप्रदेशमध्ये आम्ही शंभर टक्के जिंकत आहोत, छत्तीसगड तर आम्ही जिंकलेलेच आहे आणि विशेष रूपाने स्पष्ट बहुमत तेलंगणामध्ये मिळतंय ते आता आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. 2024 मध्ये या देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात निवडणुकातून संपूर्ण महाराष्ट्रात देशाला दिसल्याशिवाय राहणार नाही. खरेतर लोक आता वाट बघत आहेत. मत मागायला तर या तुम्हाला दाखवतो असे बोलून दाखवत आहेत. फक्त एवढच की, नशिबाने त्यांनी हातात काही घेऊ नये. म्हणजे इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये चीड आहे, इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये उद्रेक आहे. महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही निर्णय घेत नाही, स्वार्थासाठी हे सरकार आहे. हे जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे पाच राज्याच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये किमान 200 जागा महाविकास आघाडी जिंकेल असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा :

आदल्या दिवशी राजीनामा, आज शरद पवारांची भेट; नेमकं शिजतंय काय? 
डॉ. बबनराव तायवाडेंना धमकी; नागपूर पोलिसांकडून सुरक्षा

Raj Thackeray met CM Eknath Shinde | राज ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा, नेमकं कारण सांगितलं

The post ट्रिपल इंजिन सरकारचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील – विजय वडेट्टीवार appeared first on पुढारी.

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा राज्यात सध्या ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. पण पुढील काळात या ट्रिपल इंजिनचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील. सत्तेसाठी काहीही करण्याची यांची वृत्ती आहे, सारे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भविष्यातील विदूषक म्हणून ही मंडळी ठरतील अशी परिस्थिती आहे. आता विदूषकांचे …

The post ट्रिपल इंजिन सरकारचे डब्बे सुद्धा घसरलेले दिसतील – विजय वडेट्टीवार appeared first on पुढारी.

Go to Source