आदल्या दिवशी राजीनामा, आज शरद पवारांची भेट; नेमकं शिजतंय काय?
पुणे : ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य मागास आयोगाने बैठकीत घेतलेल्या फक्त मराठा समाजाचेच मागासलेपणाचे सर्व्हेक्षण होणार, या निर्णयावर झालेल्या मतभेदानंतर आयोगाचे सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. हे सर्व ताजं असतांना आज अचानक बालाजी सागर किल्लारीकर यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि किल्लारीकर यांच्या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत.
यावेळी किल्लारीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य आयोगावर राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न विचारला असता किल्लारीकर म्हणाले की ‘राजकीय दबाव वैगरे आयोगावर कधी जाणवला नाही पण एक नक्की आहे की आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना मात्र पाळल्या जातात नाही किंवा त्यावर काम होतांना दिसत नाही.’
तसेच ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मागास आयोग स्वातंत्र्य स्वरूपाचा आहे, त्याची कार्यपद्धती स्वातंत्र्य आहे. राजकीय हस्तक्षेप त्यात नसतो. पण जेव्हा जेव्हा आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा मात्र आयोगाकडे संकलित माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा आणायची गरज आहे.
हेही वाचा
अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत
डॉ. बबनराव तायवाडेंना धमकी; नागपूर पोलिसांकडून सुरक्षा
Pune : बारा गावांसाठी करंदी उचलपाणी योजना
The post आदल्या दिवशी राजीनामा, आज शरद पवारांची भेट; नेमकं शिजतंय काय? appeared first on पुढारी.
पुणे : ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य मागास आयोगाने बैठकीत घेतलेल्या फक्त मराठा समाजाचेच मागासलेपणाचे सर्व्हेक्षण होणार, या निर्णयावर झालेल्या मतभेदानंतर आयोगाचे सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. हे सर्व ताजं असतांना आज अचानक बालाजी सागर किल्लारीकर यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि किल्लारीकर यांच्या भेटीनंतर …
The post आदल्या दिवशी राजीनामा, आज शरद पवारांची भेट; नेमकं शिजतंय काय? appeared first on पुढारी.