इस्रायल पुन्‍हा राबविणार ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास रक्‍तरंजित संघर्षाचा भडका सात दिवसांच्‍या युद्धविरामानंतर पुन्‍हा एकदा उडाला आहे. इस्रायलने गाझामध्‍ये पुन्हा हल्ले सुरु केले आहेत. संपूर्ण गाझा पट्टीतील इमारतींवर इस्रायलने केलेले हवाई हल्ल्यात किमान १७८ लोक ठार झाले आहेत. दरम्‍यान, केवळ गाझा पट्टीतच नव्हे तर जगभरातील हमास नेत्यांना शोधून काढून गोळ्या घालण्‍याचे आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी … The post इस्रायल पुन्‍हा राबविणार ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’! appeared first on पुढारी.
#image_title
इस्रायल पुन्‍हा राबविणार ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’!


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास रक्‍तरंजित संघर्षाचा भडका सात दिवसांच्‍या युद्धविरामानंतर पुन्‍हा एकदा उडाला आहे. इस्रायलने गाझामध्‍ये पुन्हा हल्ले सुरु केले आहेत. संपूर्ण गाझा पट्टीतील इमारतींवर इस्रायलने केलेले हवाई हल्ल्यात किमान १७८ लोक ठार झाले आहेत. दरम्‍यान, केवळ गाझा पट्टीतच नव्हे तर जगभरातील हमास नेत्यांना शोधून काढून गोळ्या घालण्‍याचे आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशातील गुप्तहेर संस्था मोसादला दिले आहेत, असे वृत्त ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले आहे. (Hamas-Israel War)
नेतन्याहू यांनी दिलेल्‍या आदेशावर अंमलबजावणी करण्याच्या योजनांवर इस्रायलच्या गुप्तचर सेवा काम करत आहेत. गुप्तचर संस्था तुर्की, लेबनॉन आणि कतारमधील हमासच्या दहशतवाद्यांचा  शोध घेण्याचे काम करत असल्‍याचेही या वृत्तात नमूद करण्‍यात आले आहे. 2 नोव्हेंबर रोजी देशाला संबाेधित करताना पंतप्रधान नेतन्याहू  म्‍हणाले हाेते की, “हमासचे दहशतवादी जगाच्‍या काेठेही लपले आहेत तिथे कारवाईचे निर्देश मी मोसादला (इस्रायलची गुप्तचर संस्‍था) दिले आहेत.”  यावेळी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट म्हणाले होते की, हमास नेते शेवटच्‍या घटका माेजत आहेत. त्‍यांचा अंत जवळ आला आहे.” (Hamas-Israel War)

WSJ News Exclusive: Israel’s intelligence services are preparing to kill Hamas leaders around the world when the nation’s war in the Gaza Strip winds down https://t.co/51gFqymqsC https://t.co/51gFqymqsC
— The Wall Street Journal (@WSJ) December 1, 2023

Hamas-Israel War : इस्रायलमधील माजी गुप्तचर अधिकाऱ्यांमध्ये वाद ?
बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास नेत्यांना शोधून ठार मारण्याचा आदेश दिल्याने इस्रायलमधील माजी गुप्तचर अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. मोसादचे माजी संचालक इफ्रेम हॅलेव्ही यांनी हा आदेश अयोग्य असल्‍याचे म्हटले आहे. अशा कारवाईमुळे इस्रायल असणारा धोका दूर होणार नाही. त्याऐवजी हा संघर्ष अधिक चिघळेल असे त्‍यांनी म्‍हटले आहे. तर “हमासचे सर्व नेते, इस्रायलवर  हल्ल्याचा कट रचणारे आणि हल्ल्याचा आदेश देणार्‍या सर्वांना संपवले पाहिजे,” असे  मोसादचे माजी प्रमुख निवृत्त जनरल आमोस याडलिन यांनी म्‍हटले आहे.
 तब्‍बल २० वर्ष चाललेली ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’ माेहिम का राबवली?
१९७२ म्‍युनिक ऑलिम्पिकमध्ये पॅलेस्टिनी ‘ब्लॅक सप्टेंबर’ नावाच्या दहशतवादी गटाने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये इस्रायलच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अपहरण केले. यानंतर सर्वांना ओलिस ठेवले. पश्चिम जर्मन पोलिसांनी ओलिसांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी ११ इस्रायली खेळाडूंची हत्‍या केली हाेती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी  इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मीर यांनी ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’ (देवाचा क्राैध) ही गुप्त मोहिम राबवली. या मोहिमतंर्गत त्‍यांनी म्‍युनिक ऑलिम्पिकमध्ये हल्ल्यात सहभागी असणार्‍या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारण्याचे निर्देश देशातील गुप्‍तचर विभागाला दिले हाेते. म्युनिक हल्ल्याशी संबंधित असलेल्यांना पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा शोध पुढील २० वर्ष सुरु हाेता. इस्‍त्रायलच्‍या गुप्‍तचर विभागाने इटली, ग्रीस, सायप्रस, लेबनॉन आणि फ्रान्समध्ये कारवाई करत पॅलेस्टिनी दहशतवाद्‍यांचा खात्‍मा केला हाेता. आता पुन्‍हा एकदा इस्‍त्रायल अशीच कारवाई करेल असे मानले जात आहे.
इस्रायलच्या यापूर्वीच्‍या दहशतवाद विराेधी मोहिमा
इस्रायलच्या यापूर्वीच्‍या दहशतवाद विराेधी मोहिमा राबवल्‍या आहेत. यामध्‍ये बेरूत, लेबनॉन येथे महिलांच्या वेषातील हल्‍लेखाेरांनी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची हत्‍या केली हाेती. यानंतर दुबईत पर्यटकांच्या वेशात हमासच्या म्‍हाेरक्‍याला टीपले हाेते. सीरियातील हिजबुल्लाच्या नेत्याला मारण्यासाठी कारबॉम्बचा वापर केला गेला हाेता. तसेच इराणमधील अणुशास्त्रज्ञाला मारण्यासाठी रिमोट-नियंत्रित रायफलचा वापर केला हाेता.
१९९७ मध्‍ये हमासचा म्‍हाेरक्‍या मेशालच्‍या हत्‍येचा प्रयत्‍न
1997 मध्ये जॉर्डनमध्ये हमासचा म्‍हाेरक्‍या खालेद मेशाल याची विष देवून हत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला गेला. यासाठी  इस्रायलच्‍या गुप्‍तचर विभागातील कर्मचार्‍यांनी जॉर्डनमध्ये कॅनेडियन पर्यटक म्हणून प्रवेश केला हाेता. अम्मानमधील हमासच्या राजकीय कार्यालयाबाहेर मेशाल याच्‍या कानात विष फवारण्‍याचा प्रयत्‍न झाला हाेता; पण हा प्रयत्‍न फसला हाेता. यावेळी एका हल्‍लेखाेराला ताब्‍यात घेण्‍यात आले हाेते.
हेही वाचा : 

Israel-Hamas War | युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलचा गाझावर हल्ला, १७८ ठार
Israel-Hamas War : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, गाझा, इस्रायलमधील रुग्णालयांना मदत
Israel-Hamas war : युद्धाच्या ३९ व्या दिवशी इस्रायलचा हमासच्या ‘संसदे’वर कब्जा, IDF ने झेंडा फडकवला

 
 
 
The post इस्रायल पुन्‍हा राबविणार ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास रक्‍तरंजित संघर्षाचा भडका सात दिवसांच्‍या युद्धविरामानंतर पुन्‍हा एकदा उडाला आहे. इस्रायलने गाझामध्‍ये पुन्हा हल्ले सुरु केले आहेत. संपूर्ण गाझा पट्टीतील इमारतींवर इस्रायलने केलेले हवाई हल्ल्यात किमान १७८ लोक ठार झाले आहेत. दरम्‍यान, केवळ गाझा पट्टीतच नव्हे तर जगभरातील हमास नेत्यांना शोधून काढून गोळ्या घालण्‍याचे आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी …

The post इस्रायल पुन्‍हा राबविणार ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’! appeared first on पुढारी.

Go to Source