अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत
नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे जेव्हा बाहेर येतील, तेव्हा महाराष्ट्र हादरुन जाईल. आपण थोडे दिवस थांबा. हे सरकारच मुळात भ्रष्टाचारावर उभे आहे, घटनाबाह्य मार्गाने खोके माजून हे सरकार आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांनीच भाजपसोबत जायला सांगितल्याचा गौप्यस्फोट काल अजित पवार यांनी कर्जत येथील सभेत केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, अजित पवार जे बोलताय ते स्क्रीपटेड आहे, ती त्यांना भाजपने लिहून दिलेली स्क्रीप्ट असल्याचे राऊत म्हणाले. जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा पराभव करु शकत नाही. तेव्हा पक्ष फोडा त्यानंतर घर फोडा त्यातूनही जमलं नाही मग चारित्र्य हनन करा अशा प्रकारची निती भाजपची आहे. भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तीन्ही पक्ष संपवायचे आहेत. पण, ते शक्य नाही. आमचा मार्ग विजयाच्या दिशेने सुरु आहे. 2024 ला आमचेच राज्य येणार आहे.
भाजपात जा असे शरद पवार यांनी सांगितल्याचे सांगतात मग आपण परत का आला? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना नाव न घेता केला. एकनाथ शिंदे यांनाही पवार साहेबांनीच सांगितले का? पवार साहेब, पुरोगामी विचाराचे नेत आहेत. त्यांच्यावर भाजपने लिहलेल्या स्क्रीप्टनुसार बिनबुडाचे आरोप सुरु आहेत. एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोघेही भाजपने आखलेल्या षडयंत्राचे एक भाग असल्याचे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :
बारामती एसटी बसस्थानक चिखल अन् खड्ड्यांच्या विळख्यात
Crime news : जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; 16 जणांवर गुन्हा दाखल
नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता
The post अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत appeared first on पुढारी.
नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे जेव्हा बाहेर येतील, तेव्हा महाराष्ट्र हादरुन जाईल. आपण थोडे दिवस थांबा. हे सरकारच मुळात भ्रष्टाचारावर उभे आहे, घटनाबाह्य मार्गाने खोके माजून हे सरकार आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. शरद पवार …
The post अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत appeared first on पुढारी.